Malaysia king  Dainik Gomantak
ग्लोबल

Malaysia: ''अल्लाहच्या नावावरुन आग भडकावू नका...''; मलेशियाच्या राजाला का द्यावा लागला इशारा?

Religious Tensions Escalate In Malaysia: मलेशियामध्ये 'अल्लाह' लिहिलेले मोजे विकण्यावरुन एकच खळबळ उडाली आहे.

Manish Jadhav

Religious Tensions Escalate In Malaysia: मलेशियामध्ये 'अल्लाह' लिहिलेले मोजे विकण्यावरुन एकच खळबळ उडाली आहे. लोकांनी केके मार्ट ग्रुपच्या स्टोअर मालकांवर मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केला. रमजान महिन्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला आणि देशात धार्मिक तणाव निर्माण झाला. या मोज्यांवरुन झालेल्या वादानंतर वाढता तणाव पाहता मलेशियाचे राजे सुलतान इब्राहिम इस्कंदर यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

TOI च्या रिपोर्टनुसार, अरबी भाषेत 'अल्लाह' लिहिलेल्या मोज्याच्या प्रकरणावरुन मलेशियामध्ये हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळाल्या. देशातील काही बड्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. केके सुपर मार्टच्या चिनी मालकावर वादग्रस्त मोजे विकून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाल्यानंतर हा वाद सुरु झाला. या प्रकरणामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि मुस्लिमबहुल मलेशियामध्ये तणाव वाढला.

स्टोअर मालकाने आरोप फेटाळून लावले

दुसरीकडे, स्टोअर मालकाने आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. धार्मिक भावना दुखावणारे आपण कोणतेही काम केले नसल्याचे स्टोअर मालकाने म्हटले आहे. केके मार्ट समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष चाय की कान आणि त्यांच्या पत्नीने पुरवठादाराच्या चुकीमुळे वाद झाल्याचे म्हटले. स्टोअर मालकाने सांगितले की, 'जर कोणाला माझ्याकडून चूक झाल्याचे वाटत असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो.' दरम्यान, सुलतान इब्राहिम इस्कंदर यांनी अशा घटना रोखण्यावर भर दिला. ते म्हणाले की, ''प्रत्येकाने आणि विशेषतः समुदयातील नेत्यांनी परिपक्वतेने वागले पाहिजे. त्याचबरोबर भावना भडकावण्याचा कोणाकडूनही प्रयत्न होणार नाही याचीही खबरदारी घेतली पाहिजे.''

मलेशियाच्या मेलाकाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलय राष्ट्रवादी पक्ष उमनोच्या युवा शाखेचा नेता अकमल सालेह याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी 68 वर्षीय कार मेकॅनिकला अटक केली आहे. अकमल सालेहनेच देशभरातील केके सुपर मार्केटच्या विरोधात मोहीम सुरु केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: डिचोलीत इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

अग्रलेख: बस स्टॉपवरील 'राडा' आणि मानवता, एका फौजीच्या वेशातील देवदूताची कथा

SCROLL FOR NEXT