Burkina Faso Military Dainik Gomantak
ग्लोबल

बुर्किना फासोमध्ये तख्तापलट! बंडखोर सैनिक म्हणाले...आता लष्कराने देश व्यापला

बुर्किना फासोचे अध्यक्ष रॉच मार्क ख्रिश्चन काबोरे (Roach Mark Christian Cabore) यांना बंडखोर सैनिकांनी ओलीस ठेवले होते.

दैनिक गोमन्तक

बुर्किना फासोमध्ये बंडखोर सैनिकांनी सत्तापालट केला आहे. सोमवारी, 10 हून अधिक बंडखोर सैनिकांनी सरकारी टेलिव्हिजनवरुन घोषणा केली की, बुर्किना फासो आता जंटाच्या (Military) नियंत्रणाखाली आहे. यापूर्वी, बुर्किना फासोचे अध्यक्ष रॉच मार्क ख्रिश्चन काबोरे यांना बंडखोर सैनिकांनी ओलीस ठेवले होते. गेल्या 18 महिन्यांतील हा तिसरा पश्चिम आफ्रिकन (West Africa) देश आहे, जिथे लष्कराने इस्लामिक अतिरेंक्याच्या (Burkina Faso Military Coup) हाताळणीवरुन सरकारच्या विरोधात उठाव झाला. (Rebels Seize Power By Ousting Burkina Faso President Roach Mark Christian Cabore)

पैट्रियोटिक मूवमेंटने आपली जबाबदारी पार पाडण्याचे ठरवले असल्याचे कॅप्टन सिडसोर काबेर ओएड्रागो (Sidsore Kaber Ouedraogo) यांनी म्हटले. इस्लामिक बंडखोरीमुळे बिघडलेली सुरक्षा परिस्थिती आणि संकटाचा सामना करण्यास राष्ट्रपतींच्या असमर्थतेमुळे सैनिक काबोरे यांना अध्यक्षपदावरुन पायउतार करत आहे. दुसरीकडे मात्र अध्यक्ष रॉच मार्क ख्रिश्चन काबोर कुठे आहेत हे स्पष्ट झालेले नाही. त्याच वेळी, जंटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, केवळ सत्तापालट करण्यात आला होता, "अटक करण्यात आलेल्या लोकांना कोणतीही इजा पोहोचविण्यात आलेली नाही, या सर्वांना सन्मानाने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे."

देशात संचारबंदी लागू

या बंडात सहभागी असलेल्या एका सैनिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, काबोरे यांनी राजीनामा सादर केला आहे. नवीन लष्करी राजवटीने बुर्किना फासोचे संविधान आणि 'नॅशनल असेंब्ली' विसर्जित केल्याचे सांगितले. देशाच्या सीमाही बंद करण्यात आल्या असून रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. देशाचा नवा नेता निवडणुका घेण्यासाठी वेळ ठरवेल, जी सर्वांना मान्य आहे, असे सविस्तर माहिती न देता औड्रागो म्हणाले. राज्य प्रसारक 'RTB' वर वाचलेल्या या प्रेस रिलीझवर देशाचे नवे लष्करी नेते, लेफ्टनंट कर्नल पॉल हेन्री सँडाओगो दामिबा यांनी स्वाक्षरी केली होती. सोमवारच्या घोषणेदरम्यान ते कॅमेऱ्यासमोर न राहता प्रवक्त्याच्या शेजारी बसले.

बुर्किना फासोमध्ये दीर्घकाळ निदर्शने सुरु आहेत

विशेष म्हणजे, रविवारी रात्री उशिरा बुर्किना फासोचे राष्ट्राध्यक्ष रॉच मार्क ख्रिश्चन काबोर यांच्या निवासस्थानाजवळ गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. आदल्या दिवशी बंडखोर सैन्याने लष्करी तळावर कब्जा केला होता. एका निवेदनात, काबोर यांच्या राजकीय पक्षाने बंडखोर सैनिकांवर राष्ट्रपती आणि दुसर्‍या सरकारी मंत्र्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, असल्याचे म्हटले आहे. औगाडौगौमधील अध्यक्षीय निवासस्थान सशस्त्र सैन्यांनी वेढले होते.

काबोरे 2015 पासून अध्यक्ष आहेत आणि नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांना विरोध होत आहे. त्यांनी काही काळापूर्वी देशाच्या पंतप्रधानांना बरखास्त करुन मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्यांची बदली केली होती. एकेकाळी शांतताप्रिय असलेल्या या पश्चिम आफ्रिकेतील देशात हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत, कारण इथे अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट गटांचे हल्ले वाढत आहेत. अलिकडच्या वर्षांत हजारो लोक मारले गेले असून सुमारे 1.5 दशलक्ष विस्थापित झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT