Roch Marc Christian Kaboré
Roch Marc Christian KaboréDainik Gomantak

बुर्किना फासोमध्ये सत्तापालटाचा धोका! बंडखोरांनी राष्ट्रपतींना केले कैद

बुर्किना फासोचे अध्यक्ष रॉच मार्क ख्रिश्चन काबोरे (Roch Marc Christian Kaboré) यांना बंडखोर सैनिकांनी लष्करी छावणीत कैद केले आहे.

Burkina Faso चे अध्यक्ष रॉच मार्क ख्रिश्चन काबोरे (Roch Marc Christian Kaboré) यांना बंडखोर सैनिकांनी लष्करी छावणीत कैद केले आहे. सुरक्षा सूत्रांनी आणि पश्चिम आफ्रिकेच्या (West Africa) एका अधिकाऱ्याने यासंबंधीची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. याआधी रविवारी राजधानी औगाडौगुमधील (Ouagadougou) राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. सोमवारी सकाळी राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहने त्यांच्या निवासस्थानाजवळ दिसली होती. त्या वाहनांवर गोळ्यांच्या खुणाही दिसून आल्या होत्या. (Burkina Faso President Roch Marc Christian Kaboréwas Arrested By Rebels)

दरम्यान, राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, रात्रभर गोळ्यांचा आवाज ऐकू आला. तथापि, सरकारने रविवारी देशात सत्तापालट झाल्याच्या अफवांचे खंडन केले, तर लष्करी छावण्यांमधून गोळीबार बरेच तास सुरु असल्याचे देखील सांगितले. त्याच वेळी, बंडखोर सैनिकांनी इस्लामिक दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईसाठी अधिक समर्थनाची मागणी केली. पश्‍चिम आफ्रिकन देशात अलिकडच्या काही महिन्यांत दहशतवाद्यांकडून सातत्याने होत असलेल्या नागरिक आणि सैनिकांच्या हत्येमुळे निराशा वाढली आहे. यातील काही लोक इस्लामिक स्टेट (Islamic State) आणि अल कायदाशी (al qaeda) संबंधित आहेत.

Roch Marc Christian Kaboré
तालिबान ला मान्यता मिळनार? नॉर्वे येथे चर्चा सुरू

परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा सरकारने केला

विशेष म्हणजे रविवारी रात्री उशिरा राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ गोळीबाराचा आवाज ऐकू आला. आदल्या दिवशी, बंडखोर सैनिकांनी लष्करी तळावर कब्जा केला होता, ज्यामुळे देशात लष्करी उठाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. लष्कराच्या तळावर तासनतास गोळीबार सुरु असतानाही परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी लोकांना धीर देण्यासाठी सांगितले. परंतु दिवसाअखेरीस बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्या सरकारविरोधी आंदोलकांनी काबोरे यांच्या पक्षाच्या इमारतीलाही आग लावली. गोळीबाराच्या आवाजाव्यतिरिक्त तिथे हेलिकॉप्टरचे आवाजही ऐकू येत असल्याचे परिसरातून सांगण्यात आले.

राष्ट्रपतींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रचंड निदर्शने

देशातील इस्लामिक अतिरेकी हाताळण्यावरुन सरकारच्या वाढत्या असंतोषानंतर रविवारी काबोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. सरकारविरोधी निदर्शकांनी बंडखोर सैन्याला जाहीर पाठिंबा दिला. राजधानीत जमा झालेला जमाव पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ECOWAS म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्चिम आफ्रिकन प्रादेशिक गटाने लष्करी बंडानंतर गेल्या 18 महिन्यांत माली आणि गिनीला आधीच निलंबित केले आहे. त्यांनी बुर्किना फासोच्या अध्यक्षांच्या समर्थनार्थ एक निवेदन जारी केले. त्यामध्ये बंडखोरांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com