Chandrayaan-3 to Land on Moon  ISRO
ग्लोबल

Chandrayaan 3 Moon Landing: ...अन् चांद्रयानाला प्रतिक्षा सुर्योदयाची

दैनिक गोमन्तक

Chandrayaan-3 to Land on Moon: चांद्रयान 3 आता शेवटच्या टप्प्यात असून विक्रम लँडरची दुसरी आणि शेवटची डी-बूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.

आता चंद्रयान 3 ला चंद्रावर लँडिंग करण्यासाठी सुर्योदयाची वाट पाहावी लागणार आहे.

आता जनसामान्यांमध्ये एक प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. चांद्रयानाला चंद्रावर लँड होण्यासाठी सूर्योदयाची वाट का पाहावी लागणार आहे ? किंवा रशियाच्या आधी चंद्राजवळ पोहोचूनही 'चांद्रयान 3'ला 'लूना 25' आधी लँडिंग का शक्य नाही? चला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

  • सूर्योदयाची वाट का पाहावी लागणार?

चंद्रावर 14 दिवस उजेड आणि 14 दिवस रात्र असते. म्हणजेच, पृथ्वीवरचे 14 दिवस हे चंद्राच्या एका दिवसा किंवा रात्रीएवढे असतात. चांद्रयानामधील उपकरणं ही सौरउर्जेवर चालणारी आहेत. त्यामुळेच, सूर्याच्या प्रकाशात लँडिंग करणे गरजेचे आहे.

चांद्रयान-3 हे चंद्रावर दोन आठवडे असणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी चंद्रावरचा दिवस सुरू होतो त्याच लँडिंग करणे शक्य आहे.

चंद्रावर रात्रीच्या वेळी अतिशय थंड वातावरण असते. हे तापमान -100 डिग्री सेल्सिअस एवढे कमी होते. या तापमानात कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक उपकरणं काम करत नाहीत. त्यामुळेच 23 तारखेला चंद्रावर दिवस उजाडण्यापूर्वी लँड करणे चांद्रयानाला शक्य नाही.

  • रशियाच्या लूना 25 बरोबर स्पर्धा

भारतानं चंद्रयान ३ चे प्रक्षेपण केले आणि संपूर्ण जगभरात चंद्रयान ३ ची चर्चा सुरु झाली. हे चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान ठरणार असल्याने भारत एक नवीन रेकॉड तयार करणार असे म्हटले जाऊ लागले.

मात्र चंद्रयान 3 नंतर रशियाने लुना 25 यानाचे प्रक्षेपण केले आणि चर्चांना वेगळे वळण लागले.

रशियाचं लूना 25 हेदेखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार असल्यामुळं आता हा विक्रम रशियाच्या नावावर होणार आहे. लूना हे चांद्रयानाच्या आधी, म्हणजेच २१ ऑगस्टला चंद्रावर लँड होणार आहे.

भारताचे 'चांद्रयान-3' आणि रशियाचे 'लूना 25' हे दोन्ही सध्या चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहेत. रशियाचं लूना हे एका शक्तिशाली रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले होते.

त्यामुळे उशीरा प्रक्षेपित होऊनही, अगदी कमी वेळेत ते चंद्रापर्यंत पोहोचले आहे. महत्वाचे म्हणजे रशियाचे लूना 25 देखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

चांद्रयान 3 च्या उलट रशियाच्या 'लूना 25' ला लँडिंग करण्यासाठी सूर्यप्रकाश असण्याचं बंधन कारण लूनामध्ये सोलार उपकरणांसोबतच एक जनरेटर देखील देण्यात आला आहे.

हा जनरेटर रात्रीच्या वेळी उपकरणांना सुरू ठेवेल. याबरोबरच लूना-25 हे चंद्रावर एक वर्षासाठी राहणार आहे. त्यामुळे ते कोणत्याही दिवशी लँड करू शकणार आहे.

आता इस्त्रोचा प्राथमिक उद्देश चंद्रावर चंद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग करणे हा असणार आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान 3 आणि लूना 25 च्या लँडिंगकडे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT