Ratan Tata Twitter/ @AusHCIndia
ग्लोबल

Ratan Tata: रतन टाटा यांना मिळाला 'या' देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार!

Manish Jadhav

Ratan Tata: प्रसिद्ध भारतीय उद्योगपतींपैकी एक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा सर्वोच्च ऑस्ट्रेलियन नागरी सन्मान मिळाला आहे.

रतन टाटा यांचे पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ'फॅरेल यांनी ट्विटरवर शेअर केले. पोस्टमध्ये, O'Farrell म्हणाले की, "रतन टाटा हे बिझ, उद्योग आणि परोपकारातील एक दिग्गज आहेत."

बॅरी ओ'फॅरेल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'रतन टाटा (Ratan Tata) हे केवळ बिझ, उद्योगामधील एक दिग्गज नाहीत, तर त्यांच्या योगदानाने महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया (AO) चा संबंध रतन टाटा यांच्या दीर्घकालीन बांधिलकीशी आहे.'

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रतन टाटा यांची ऑस्ट्रेलिया-भारत (India) द्विपक्षीय संबंधांसाठी केलेल्या सेवेमुळे ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजन ऑफ द ऑर्डरमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी विशेषतः व्यवसाय, गुंतवणूक आणि परोपकार या क्षेत्रात काम केले आहे.

भारतातही पुरस्कार मिळाला

रतन टाटा यांना भारतातील काही सर्वोच्च नागरी पुरस्कारही मिळाले आहेत. रतन टाटा यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Controversy: पोलिसांची शोध मोहीम संशयाच्या घेऱ्यात! वेलिंगकरांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी

Rashi Bhavishya 10 October 2024: अडलेली कामं पूर्ण होतील, पैसेही परत मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कोणत्या राशीसाठी ठरेल आजचा दिवस खास!

RATAN TATA Passess Away: उद्योग 'रतन' हरपले; देशाने दयाळू, विलक्षण माणूस गमावला, PM मोदींनी व्यक्त केला शोक

Ratan Tata RIP: रतन टाटांचा सदैव सोबती ‘गोवा’, Humens Of Bombay च्या CEO नी सांगितलेला किस्सा!

Ajay Devgan - Kajol Goa Villa: अजय देवगन - काजोलच्या गोव्यातील अलिशान व्हिलात राहण्याची संधी; एका रात्रीसाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये

SCROLL FOR NEXT