Ratan Tata: टाटांनी घेतला बदला! फोर्डच्या चेअरमनने केला होता अपमान, Video

Ratan Tata: रतन टाटा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात.
Ratan Tata
Ratan TataDainik Gomantak
Published on
Updated on

Ratan Tata: रतन टाटा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांच्या दातृत्वाच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना सेलिब्रिटी असूनही अपमानाला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्या अपमानाचा बदला घेतला ते आता उदाहरण बनले आहे. ज्येष्ठ भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर त्यांच्या अपमानाच्या कथेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हर्ष गोएंका यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे

आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीतून परत आल्याची कहाणी सांगितली आहे (रतन टाटा विरुध्द फोर्ड). 90 च्या दशकात, टाटा मोटर्सची (Tata Motors) फोर्डबरोबर कार डिव्हिजन विकण्यासंबंधी बोलणी सुरु होती. यादरम्यान, फोर्डच्या चेअरमनने त्यांचा अपमान केला. त्यानंतर रतन टाटा यांनी कार डिव्हिजन विकण्याचा निर्णय पुढे ढकलला आणि फोर्डला असा धडा शिकवला, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. पाहा हा खास व्हिडिओ.

Ratan Tata
Tata समूहाच्या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सरसावले; टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिलं पत्र

अपमानाची संपूर्ण कहाणी

व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोएंका यांनी लिहिले की, 'फोर्डकडून अपमानित झाल्यावर रतन टाटा यांची प्रतिक्रिया.' या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की, 90 च्या दशकात रतन टाटा यांनी त्यांच्या टाटा मोटर्सद्वारे टाटा इंडिका लाँच केली होती, परंतु हे लॉन्च फ्लॉप ठरले आणि त्यांना कार विभाग विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. यासाठी रतन टाटा यांना फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड यांच्याबरोबर 1999 मध्ये डील करायची होती.

टाटा मोटर्सने 9 वर्षांत उंची गाठली

अतुलनीय व्यक्तिमत्त्व असलेले रतन टाटा (Ratan Tata) या अपमानानंतरही शांत राहिले आणि त्यांनी त्याच रात्री टाटा मोटर्सचा कार विभाग विकायचा नाही, असा निर्णय घेतला. टाटा त्याच रात्री मुंबईला परतले. यानंतर, त्यांनी या अपमानाबद्दल कोणाजवळही वाच्यता केला नाही, परंतु आपले संपूर्ण लक्ष कंपनीच्या कार विभागाला उंचीवर नेण्यावर केंद्रित केले. या घटनेनंतर जवळपास नऊ वर्षांनी, म्हणजे 2008 मध्ये त्यांच्या टाटा मोटर्सने जगभरातील बाजारपेठेत वर्चस्व गाजवले होते. कंपनीच्या गाड्या वेस्ट सेलिंग श्रेणीमध्ये शीर्षस्थानी आल्या होत्या.

Ratan Tata
Tata Tiago EV: Tata ने लॉन्च केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

बिल फोर्डकडून आश्चर्यकारक बदला

तोपर्यंत बिल फोर्ड यांच्या नेतृत्वाखालील फोर्ड मोटर्सची अवस्था बिकट झाली होती. बुडणाऱ्या फोर्ड कंपनीच्या मदतीसाठी रतन टाटा पुढे आले. त्यांच्या अपमानाचा बदला घेण्याचा हा एकमेव मार्ग होता. जेव्हा फोर्ड मोठ्या प्रमाणात तोट्यात होते तेव्हा 2008 मध्ये टाटा चेअरमन रतन टाटा यांनी अध्यक्ष बिल फोर्ड यांना त्यांच्या कंपनीचे सर्वात लोकप्रिय जग्वार आणि लँड रोव्हर ब्रँड्स खरेदी करण्याची ऑफर दिली. यासाठी स्वतः बिल फोर्ड यांना त्यांच्या संपूर्ण टीमसह मुंबईत यावे लागले होते.

Ratan Tata
Tata Motors: टाटा टियागो XT Rhythm बाजारात; किंमत, फिचर्स जाणून घ्या

फोर्ड म्हणाले - 'तुम्ही आमच्यावर उपकार करत आहात'

मुंबईत (Mumbai) रतन टाटांची ऑफर स्वीकारुन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचे आभार मानले आणि म्हणाले की, 'जॅग्वार आणि लँड रोव्हर ब्रँड्स खरेदी करुन तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com