Ranjit Singh Statue: करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबमध्ये महाराजा रणजित सिंग यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. सर्वप्रथम, हा पुतळा लाहोरच्या रॉयल फोर्टमध्ये 2019 मध्ये रणजित सिंग यांच्या 180 व्या पुण्यतिथीनिमित्त स्थापित करण्यात आला होता. मात्र 2019 मध्ये पुतळा बसवण्यात आल्यापासून आतापर्यंत तीन वेळा तोडण्यात आला. राणी जिंदनच्या राजवाड्यासमोर शाही किल्ल्यात हा पुतळा बसवण्यात आला होता. यूकेमधील एसके फाऊंडेशनचे अध्यक्ष असलेल्या शीख इतिहासकार बॉबी सिंग बन्सल यांनी ही मूर्ती भेट दिली होती. फकीर खाना संग्रहालयाचे संचालक फकीर सैफुद्दीन यांच्या देखरेखीखाली महाराजा रणजित सिंग यांचा पुतळा तयार करण्यात आला.
तथापि, नंतर एका गटाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे नुकसान केले, प्रथम सप्टेंबर 2020 मध्ये आणि नंतर त्याचवर्षी डिसेंबरमध्ये. पुतळा दुरुस्त केल्यानंतर, तो पुन्हा स्थापित करण्यात आला, परंतु त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये तिसऱ्यांदा तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर लाहोर प्राधिकरणाने पुन्हा एकदा पुतळ्याची डागडुजी केली होती, मात्र गेल्या दोन वर्षांपासून या पुतळ्याला हानी पोहोचेल या भीतीने रॉयल फोर्टमध्ये तो पुन्हा बसवण्याचा निर्णय प्राधिकरणाला घेता आला नाही.
त्यानंतर आता करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथील दर्शन स्थळाजवळ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण येथील सुरक्षा व्यवस्था लाहोर शाही किल्ल्यापेक्षा मजबूत आहे. अशा स्थितीत समाजकंटकांनी आतमध्ये जाऊन पुतळ्याचे नुकसान करणे शक्य होणार नाही.
भारतासह जगभरातील शीख यात्रेकरुंव्यतिरिक्त, इतर पर्यटक देखील गुरुद्वारा करतारपूर साहिबला भेट देण्यासाठी येतात. महाराजा रणजित सिंग यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 रोजी गुजरांवाला (आता पाकिस्तानमध्ये) येथे झाला. ते पंजाबच्या शीख साम्राज्याचे संस्थापक आणि 1801-39 पर्यंतचे महाराज देखील होते. यानंतर 27 जून 1839 रोजी लाहोरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.