थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान-ओ-चा यांना मास्क न घातल्याबद्दल 6,000 बहत म्हणजेच 14,270 रुपये दंड ठोठावण्यात आला. थायलंड सरकार देशातील कोरोना विषाणूच्या नव्या लाटेचा सामना करण्यासाठी झटत आहे. थायलंडमध्ये 1 मेपासून थायलंडमधील नागरिक वगळता भारतातून येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी थायलंडमध्ये कोरोनाच्या २०४८ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि आणखी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. एका माध्यमाच्या वृत्तानुसार, सोमवारी लसी खरेदी सल्लागारांशी झालेल्या बैठकीत जनरल प्रुत यांना मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. (Punitive action for not wearing a mask by the Prime Minister of Thailand)
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोमवारपासून मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकॉकचे राज्यपाल अस्विन क्वानमुआंग यांनी सोमवारी फेसबुकवर पोस्ट केले की त्यांनी पंतप्रधानांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे.पंतप्रधानांवर सोशल मीडियावार टीका झाल्यानंतर शहर अधिकारी कार्यरत झाले. त्याचं फेसबुक पेजवर सुरु असलेल्या मीटिंगमध्ये त्यांना बिना मास्कचे पहिले होते. त्यावेळी बाकी सर्वानी मास्क घातलेला होता. थायलंड भारताच्या प्रवाशांसाठी शनिवारी आपल्या सीमा बंद करेल परंतू यातून थायलंडमधील नागरिकांना सूट देण्यात आली आहे. ही घोषणा थायलंडच्या नवी दिल्लीतील दूतावासाने रविवारी केली.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियानं देखील कठोर निर्णय घेतला आहे. भारतातून ऑस्ट्रेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमानं रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रोलिया सरकारने घेतला आहे. याआधी एअर इंडियानं ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं रद्द केली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.