Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

फ्रान्समध्ये पाकिस्तानविरोधात निदर्शने, 'ब्लॅक लिस्ट' मध्ये टाकण्याची होतेय मागणी

दैनिक गोमन्तक

फ्रान्समधील फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या कार्यालयाबाहेर शनिवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावी अशी मागणी दहशतवादाच्या वित्तपुरवठ्यावर नजर ठेवणाऱ्या FATF कडे आंदोलकांनी केली आहे. या आंदोलकांमध्ये अफगाण, बलुच आणि उइगर समुदायातील लोकांचा समावेश होता. FATF कडे आंदोलकांनी केली आहे. या आंदोलकांमध्ये अफगाण, बलुच आणि उइगर समुदायातील लोकांचा समावेश होता. दहशतवादाला पाठबळ देण्यामध्ये पाकिस्तान (Pakistan) मोठी भूमिका बजावत असल्यामुळे FATF कार्यालयाबाहेर आंदोलकांनी आंदोलन केले. (Protests Are Taking Place In France To Blacklist Pakistan)

दरम्यान, या प्रदर्शनाशी संबंधित एक व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी सोशल मिडियावरील (Social media) ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये लोक पाकिस्तानच्या विरोधात फलक घेऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत. पॅरिसमध्ये (Paris) FATF प्लेनरी आणि वर्किंग ग्रुपच्या बैठकीपूर्वी, विश्लेषकांच्या मतानुसार, पाकिस्तानने दिलेल्या अटी पूर्ण केल्या नाहीत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ग्लोबल अँटी टेररिझम आणि अँटी मनी लाँडरिंग ऑर्गनायझेशन (FATF) च्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते.

2018 पासून पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये

पाकिस्तान जून 2018 पासून FATF च्या ग्रे लिस्टमध्ये आहे. या सूचीमुळे त्यांच्या आयात, निर्यात आणि आंतरराष्ट्रीय क्रेडिटच्या मर्यादित प्रवेशावर विपरित परिणाम झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यापासून इम्रान खान (Imran Khan) सातत्याने पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र त्यांनी FATF च्या अटी पूर्ण केल्या नाहीत. पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तहरीक-ए-तालिबान समोर पाकिस्तान (टीटीपी) हतबल झाला आहे.

अर्थव्यवस्थेला मोठा धक्का

एका मीडिया रिपोर्टमध्ये पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ डॉ नफे सरदार (Dr. Nafe Sardar) यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "FATF ने पाकिस्तानला 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकल्यास आर्थिक शिक्षा आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला जाईल." पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा धक्का असेल. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत FATP च्या ग्रे-लिस्टिंगमुळे 2008-2019 दरम्यान सुमारे $38 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT