Sheikh Hasina India Visit Dainik Gomantak
ग्लोबल

PM शेख हसीनांचं मोठं वक्तव्य, 'रोहिंग्या मुस्लिम देशासाठी मोठं ओझं...'

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत दौऱ्यावर येण्यापुर्वी बांगलादेशातील हिंदू मंदिरे आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या विध्वंसाबद्दल मत व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Sheikh Hasina India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सोमवारी, 5 सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी त्यांनी बांगलादेशातील हिंदू मंदिरे आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या विध्वंसाबद्दल मत व्यक्त केले आहे. रोहिंग्या मुस्लिमांवर बोलताना त्या म्हणाल्या की, 'हे लोकं देशासाठी खूप मोठे ओझे आहेत आणि या समस्येवर तोडगा काढण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो असे मला वाटते.'

रोहिंग्या मुस्लिम हे आपल्या देशासाठी आव्हान बनले आहेत, हे त्यांनी मान्य केले आहे. त्या म्हणाल्या, "तुम्हाला माहिती आहे की, हे लोकं आमच्यासाठी खूप मोठे ओझे आहे. भारत हा एक मोठा देश आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना सामावून घेऊ शकता. कारण तुमच्याकडे त्यांची संख्या पण कमी आहे. मात्र बांगलादेशात एक लाखाहून अधिक रोहिंग्या मुस्लिम आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत. आंतरराष्ट्रीय समुदाय आणि शेजारी देशांनी काही पावले उचलली पाहिजेत जेणेकरून ते त्यांच्या देशात परत येतील.

आंतरराष्ट्रीय समुदायाशी बोलून रोहिंग्यांबाबत चिंता व्यक्त केली

शेख हसीना म्हणाल्या की, मानवतावादी आधारावर आम्ही त्यांना आश्रय दिला आणि सर्व काही पुरवले. कोविड काळात, आम्ही सर्व रोहिंग्यांचे लसीकरण देखील केले, ते येथे छावणी करून जगत आहेत. अमली पदार्थांची तस्करी, शस्त्र तस्करी, महिलांची तस्करी अशा धंद्यात काही लोक पकडले जातात. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ते जितक्या लवकर त्यांच्या देशात पोहोचतील तितके चांगले.

संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना पाठिंबा

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, 'आम्ही संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना पाठिंबा दिला. अडचणींचा सामना करत असताना त्यांना आश्रय देण्यात आला. आता त्यांनी त्यांच्या देशात परत जावे. शेजारी देश असल्याने भारत यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मला वाटते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT