Prime Minister Of Israel Benjamin Netanyahu declares war on Hamas, rains bombs on Gaza Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Palestine War: इस्त्रायलने हमासविरुद्ध घोषित केले युद्ध, गाझावर बॉम्बचा वर्षाव

Israel: गाझावर हवाई हल्ले सुरू झाले आहेत. इस्रायली हवाई दलाची डझनभर लढाऊ विमाने गाझा पट्टीत अनेक ठिकाणी हमास या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. या परिसरावर इस्त्रायल बॉम्बचा वर्षाव केला आहे.

Ashutosh Masgaunde

Prime Minister Of Israel Benjamin Netanyahu declares war on Hamas, rains bombs on Gaza:

पॅलेस्टाईनला धडा शिकवण्यासाठी इस्रायलने आपली लढाऊ विमाने युद्धभूमीवर उतरवली आहेत. इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत हमासविरोधात 'ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स' सुरू केले आहे.

गाझावर हवाई हल्ले सुरू झाले आहेत. इस्रायली हवाई दलाची डझनभर लढाऊ विमाने गाझा पट्टीत अनेक ठिकाणी हमास या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. या परिसरावर इस्त्रायल बॉम्बचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही युद्धात (Israel Palestine War) उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हमासने इस्रायल आणि तेथील नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या परिसराचा सैन्याने ताबा घेतला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जमा करण्यास सांगितले आहे. शत्रूला इतकी किंमत मोजावी लागेल की त्याने कधीच विचार केला नसेल.

शनिवारी सकाळी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने गाझा पट्टीतून रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू केली. हे हल्ले इस्रायलवर करण्यात आले. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरोधातील लष्करी कारवाई म्हटले आहे.

हमासने सुमारे 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. एवढेच नाही तर त्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेतली. याशिवाय पाच इस्रायली सैनिकांचे अपहरण करण्यात आले आहे.

या हल्ल्यांमध्ये सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

पॅलेस्टिनी हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, आज सकाळी इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू करून हमासने मोठी चूक केली आहे.

या घटनेनंतर इस्रायलचे भारतातील राजदूत नॉर गिलॉन यांनीही ट्विट केले आहे. ते म्हणाले, पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी दुतर्फा हल्ला केला आहे. जमीन आणि आकाश अशा दोन्ही बाजूंनी आक्रमणे झाली आहेत. हमासच्या दहशतवाद्यांकडून रॉकेट आणि जमिनीवर घुसखोरी करण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य नाही, पण इस्रायल जिंकेल.

इस्रायलने 'युद्ध' घोषित केले आहे आणि परिसरातील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांवर हल्ले केले आहेत. शनिवारी पॅलेस्टाईनने आपल्या ताब्यातील गाझा या भागातून हल्ला केला.

हमासचे वरिष्ठ लष्करी कमांडर मोहम्मद देईफ यांनी कारवाई सुरू झाल्याची घोषणा केली. त्यांनी पॅलेस्टिनींना शेवटपर्यंत याविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता रॉकेट हल्ले सुरू झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT