President Volodymyr Zelenskyy | Russia Ukraine War News  Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करा, नाहीतर...

दैनिक गोमन्तक

युक्रेन आणि रशिया (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 19 वा दिवस आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी नाटोला (NATO) त्यांच्या देशात नो-फ्लाय झोन लागू करण्याची विनंती केली. देशाला संबोधित करताना, त्यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की नाटोला आधीच इशारा देण्यात आला होता की रशिया आवश्यक निर्बंधांशिवाय युद्ध सुरू करेल, त्याची संपूर्ण विचारधारा खोट्यावर आधारित आहे आणि तो नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइन नष्ट करुन टाकेन असंही झेलेन्स्की म्हणाले. (President Volodymyr Zelenskyy called on NATO to establish a no-fly zone in his country)

"तुम्ही आमचे आकाश बंद केले नाही तर, तेव्हा ही फक्त वेळेची गोष्ट आहे, रशियन रॉकेट तुमच्या प्रदेशात, नाटो नागरिकांच्या घरांवर आदळतील त्याला विलंब लागणार नाही," ते म्हणाले. यासोबतच त्यांनी युद्धाशी संबंधित महत्त्वाची माहिती देखील शेअर केली आहे. झेलेन्स्की म्हणाले की याव्होरीव्ह चाचणी साइटवरती गोळीबार झाला होता, जे दर्शविते की रशियाला धमकावणे कार्य करत नाहीये. हॉस्पिटलमध्ये मी आमच्या लोकांना भेटलो आणि तेथे रशियनांवरही उपचार केले जात आहेत. (Russia Ukraine War News)

युक्रेनच्या डॉक्टरांचे मनापासून आभार

झेलेन्स्की म्हणाले, युक्रेनियन डॉक्टर रशियन लोकांचे जीव वाचवत आहेत. आणि ते समजून घेण्यासारखे आहे. कारण ते माणसं आहेत, प्राणी नाहीत. मी Kyiv, Dnipro, Vinnitsa, Lviv, Chernihiv, Donbass, Kharkiv, Melitopol, Mariupol येथे काम करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि परिचारिकांचा आभारी आहे…. बल्गेरिया, स्लोव्हाकिया, झेक प्रजासत्ताक, रोमानिया, पोलंड आणि ब्रिटन यांच्याशी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय चर्चा झाल्याचे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

मानवी कॉरिडॉरचे काम

युद्ध संपवण्यासाठी रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्येही चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडणार आहे. युक्रेन-रशिया संवादातील आमच्या शिष्टमंडळाचे कार्य राष्ट्रपतींची बैठक आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे असणार आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. दहाहून अधिक मानवी कॉरिडॉरमध्ये काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. कीव, लुहान्स्क भागात एका दिवसात 5550 लोकांची सुटका करण्यात आली. सहा दिवसांत 130,000 हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली परंतु दुर्दैवाने मारियुपोलमधील मानवी कॉरिडॉर अवरोधित करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT