रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पंधरा दिवसांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. या युद्धात आत्तापर्यंत युक्रेनचे हजारो निरपराध नागरिक मारले गेले आहेत. बॉम्ब हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारती, सार्वजनिक ठिकाणांची विदीर्ण अवस्था अनेक व्हिडिओ आणि फोटोंमधून समोर आली आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मृत नागरिकांच्या मृतदेहांचं सामूहिक दफन करण्यात येत आहे. युक्रेनमधील (Ukraine) मारियुपोल इथ गेल्या 12 दिवसांत रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये 1582 नागरिकांचा मृत्यू (death) झाला आहे.
या सर्व मृतदेहांचं दफन करण्यासाठी एक चारी खोदण्यात आली असून यामध्ये हे मृतदेह एकामागे एक ठेवून त्यांचे दफन करण्यात येत आहे. हे काम करत असलेला एक सामाजिक कार्यकर्ता वोलोदिमिर बायकोव्हस्की यांनी म्हटलं की, या युद्धामध्ये कोण दोषी कोण योग्य हे मला माहिती नाही. हे कुणी सुरु केलं हे मला माहिती नाही, पण हे आता थांबायला हवं.
दरम्यान, रशियन सैन्यानं वेढा दिलेल्या मारियुपोल शहरातील आपत्ती ही पृथ्वीवरील मानवतेविरोधातील सर्वांत वाईट आपत्ती आहे. युक्रेनियन सैन्याला पराभूत करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन हे दुबळ्या आणि निशस्त्र नागरिकांवर बॉम्बफेक करत आहेत आणि मानवतावादी मदत रोखत आहेत. हे युद्ध थांबवण्यासाठी आम्हाला विमानांची गरज आहे" असं युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
मारियुपोलमध्ये लाईट-पाणी बंद
मारियुपोल शहराची सध्या लाईट-पाणी बंद झालं आहे. रशियन सैन्याच्या हल्ल्यात इथल्या इमारती, घरं, रुग्णालयं (Hospital) आणि रस्ते उद्ध्वस्त झाली आहेत. या अभूतपूर्व स्थितीवर भाष्य करताना युक्रेनमधील एका शेतकऱ्यानं (farmer) म्हटलं की, युद्धामुळं कृषी उत्पादन आणि दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. आमच्याकडे बियाणांची, इंधनाची आणि खतांची कमतरता आहे, सर्व रस्ते बंद झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.