पोलंडमध्ये एअरशो सरावादरम्यान एफ - १६ फायटर जेट क्रॅश झाले आहे. यात पायलटचा मृत्यू झाला आहे. एअरशो सुरुसाठी सुरु असलेल्या सरावादरम्यान ही घटना घडली. हवेतून फायटर जेट खाली कोसळताच त्याने पेट घेतला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एअर शोसाठी सुरु असलेल्या सराव अनेक लोक पाहत होते, काहींनी यावेळी चित्रिकरण केले. उंच हवेत असताना फायटरचे नियंत्रण सुटले आणि ते थेट जमिनीच्या दिशेने खाली आले. फायटर जमिनीवर कोसळताच त्याने पेट घेतला. याचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.
फायटर आवश्यक असणारी उंची गाठण्यास असमर्थ ठरले आणि खाली कोसळले. अति ज्वलनशील असलेल्या इंधनामुळे फायटरने लगेच पेट घेतला आणि यात पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारचे फायटर जेट एअरोबैटीक्ससाठी का वापरतात? असा सवाल देखील अनेकांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.