Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: वॉरंट निघाले! माजी पंतप्रधान इम्रान खान कधीही होऊ शकते अटक; घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा

अटक केल्याशिवाय परतणार नसल्याचे आयजींनी म्हटले आहे.

Pramod Yadav

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत. पाक मीडियानुसार, रविवारी (5 मार्च) तोशाखाना प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिस इस्लामाबादमधील जमान पार्क येथील निवासस्थानी पोहोचले. पाक मीडियानुसार, तोशाखाना प्रकरणात इस्लामाबाद पोलिस आल्यानंतर पीटीआयचे कार्यकर्ते इम्रान खान यांच्या लाहोरमधील निवासस्थानी जमले आहेत.

पीटीआय समर्थकांचे म्हणणे आहे की ते इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत अटक होऊ देणार नाहीत. त्याचवेळी, अटक केल्याशिवाय परतणार नसल्याचे आयजींनी म्हटले आहे. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कधीही अटक होऊ शकते. तोशाखाना प्रकरणी अटक करण्यासाठी इस्लामाबादच्या जमान पार्क येथील तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या प्रमुखाच्या निवासस्थानीही पोलीस पोहोचले आहेत. खरं तर, काही दिवसांपूर्वी, इस्लामाबाद कोर्टाने इम्रानला कोट्यवधींच्या सरकारी खजिन्याच्या (तोशाखाना) भेटवस्तू स्वस्तात विकल्याबद्दल दोषी ठरवले होते, त्यानंतर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

अटक वॉरंट घेऊन लाहोर पोलीस त्याच्या घरी पोहोचले आहेत. दुसरीकडे इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्यास सांगितले आहे. यानंतर गदारोळ होण्याची भीती आहे. याला दुजोरा देताना पाकिस्तानी मीडियाने सांगितले की, इम्रान खानविरोधात इस्लामाबादमधून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी 28 फेब्रुवारी रोजी माजी पंतप्रधानांना संघीय राजधानीत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. पीटीआयच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस लाहोरमध्ये असल्याची माहिती जिओ न्यूजने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर इम्रान खानला अटक केली जाऊ शकते.

तोशाखाना प्रकरण काय आहे ?

सत्ताधारी पाकिस्तानी लोकशाही चळवळीने तोशाखाना भेट प्रकरण निवडणूक आयोगाकडे उचलले होते. इम्रानने आपल्या कार्यकाळात वेगवेगळ्या देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, या सर्व भेटवस्तू मी तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्यांना विकल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले. नंतर ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT