Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: कोलंबोमध्ये हिंसक संघर्षानंतर संचारबंदी लागू, 20 जण जखमी

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) राजधानीत पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे.

दैनिक गोमन्तक

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या राजधानीत पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी सरकारचे समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हा कर्फ्यू (Curfew) लागू करण्यात आला आहे. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपाक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. या चकमकींमध्ये किमान 20 जण जखमी झाले आहेत. एएफपीने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, राजपाक्षे यांच्या समर्थकांनी 9 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनाबाहेर बसलेल्या निशस्त्र निदर्शकांवर लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला केला. (Police in the Sri Lankan capital Colombo has imposed a curfew)

दरम्यान, पोलीसांनी (Police) राजपाक्षे सरकारविरोधात घोषाणाबाजी करणाऱ्या आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला. दुसरीकडे, विरोधी पक्षनेत्यावर सरकार समर्थकांकडून हल्ला झाल्याचा आरोप आहे. गोटाबाया राजपाक्षे शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी आले होते.

पूर्वीच्या अहवालानुसार, राष्ट्रपती गोटाबाया राजपाक्षे यांनी कबूल केले आहे की, ''नागरिकांच्या निषेधानंतर देशातील राजकीय आणि आर्थिक संकटावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. या संकटाचा देशाच्या पर्यटनावर विपरीत परिणाम झाला आहे. पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कारखाने बंद होण्यापूर्वीच देशावरील आर्थिक बोजा वाढला होता.''

दुसरीकडे, राजकीय सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, श्रीलंकेचे (Sri Lanka) कॅबिनेट मंत्री प्रसन्ना रणतुंग, नल्का गोदाहेवा आणि रमेश पाथिराना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याच्या महिंदा राजपाक्षे यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

तथापि, सहकारी मंत्र्यांव्यतिरिक्त मंत्री विमलपुरा दिसानायके म्हणाले की, 'महिंदांचा राजीनामा देशाच्या संकटाला तोंड देण्यासाठी निरुपयोगी ठरेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT