PM Modi France Visit Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi France Visit: फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रॅंड वेलकम, लोकांनी दिल्या 'भारत माता की जय' च्या घोषणा; पाहा VIDEO

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर पोहोचले आहेत. पॅरिसच्या विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

Manish Jadhav

PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर पोहोचले आहेत. पॅरिसच्या विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी (बॅस्टिल डे) पंतप्रधान मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. पॅरिसमधील एका हॉटेलबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी भारतीय वंशाच्या लोकांनी मोठी गर्दी केली.

यावेळी, लोकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदींनी लोकांची भेट घेतली.

त्याचवेळी, संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी फ्रान्सकडून (France) भारतीय नौदलासाठी 26 राफेल लढाऊ विमाने आणि 3 स्कॉर्पीन पाणबुड्या खरेदी करण्याच्या योजनेला मंजूरी दिली.

संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की, संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीत या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली, ज्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण कर्मचारी प्रमुख जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेवांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी अनिवासी भारतीयांशी संवाद साधतील

पंतप्रधान मोदी गुरुवारी पॅरिसमधील ला सीएन म्युझिकेल येथे डायस्पोरांना संबोधित करतील. हा कार्यक्रम भारतीय दूतावास आणि सांस्कृतिक मंत्रालयाकडून आयोजित केला जाईल. यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे अधिकृत निवासस्थान एलसी पॅलेस येथे डिनरला उपस्थित राहतील. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत

पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. फ्रान्सला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, दीर्घकालीन आणि भागीदारी पुढे नेण्याबाबत फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत विस्तृत चर्चा करणार आहोत.

दुसरीकडे, या वर्षी आमच्या धोरणात्मक भागीदारीचा 25 वा वर्धापन दिन आहे. विश्वास आणि वचनबद्ध असलेले आमचे दोन्ही देश संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक, व्यापार, गुंतवणूक (Investment), शिक्षण, संस्कृती यामध्ये सहकार्य करतात. आम्ही प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही एकत्र काम करतो, असे पीएम मोदींनी एका निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 5 वेळा फ्रान्सचा दौरा केला

पहिला दौरा – 2015 मध्ये 9 ते 12 एप्रिल.

दुसरा दौरा - 1 डिसेंबर 2015

तिसरा दौरा - 2 जून 2017

चौथा दौरा- 22 ऑगस्ट 2019

पाचवा दौरा - 4 मे 2022

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT