PM Modi France Visit: फ्रान्समध्ये घुमले 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा'; भारतीय त्रि-सेवा दलाचा पॅरिसमध्ये सराव

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Bastille Day Parade 2023
Bastille Day Parade 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Indian Tri-Services contingent in Bastille Day Parade 2023: भारतीय त्रि-सेवा दलाने (Indian Tri-Services contingent) 14 जुलै रोजी फ्रान्समध्ये बॅस्टिल डे परेडसाठी (Bastille Day Parade) सराव सत्र आयोजित केले होते. यावेळी 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा' च्या धूनवर जवान मार्च करत होते.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राफेलचा युद्धसरावही सुरू

14 जुलै रोजी होणाऱ्या बॅस्टिल डे परेडसाठी योग्य समन्वय साधण्यासाठी भारतीय आणि फ्रेंच हवाई दलाच्या राफेल्स पॅरिसच्या आकाशात सराव करत आहेत, असे भारतीय हवाई दलाने सांगितले.

फ्रान्समधील या वर्षीच्या बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी झालेल्या भारतीय त्रि-सेवा दलातील भारतीय नौदलाचे कमांडर प्रतीक कुमार म्हणाले की, केवळ सशस्त्र दलांसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतातील लोकांसाठी ही एक मोठी भावना आहे की फ्रान्स सरकारकडून आम्हाला सन्मानित करण्यात आले आहे.

Bastille Day Parade 2023
Exercise And Depression: मधुमेह अन् हृदयविकार रुग्णांच्या नैराश्यावर तज्ज्ञांनी शोधला नवा फॉर्म्यूला; पाच दिवस दररोज करा...

"ही तर फ्रान्ससाठी सन्मानाची गोष्ट"

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत बोलताना, एडीपी ग्रुपचे सीईओ ऑगस्टिन डी रोमानेट म्हणाले की, भारताच्या विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये कुशलतेने सहभाग घेऊन दोन्ही देशांमधील संबंधांचा एक भाग असल्याचा ADP ग्रुपला अभिमान आहे. तसेच “बॅस्टिल डे सेलिब्रेशनसाठी पंतप्रधान मोदींचे स्वागत करणे फ्रान्ससाठी सन्मानाची गोष्ट आहे.”

भारत-फ्रान्स मैत्रिची 25 वर्षे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीमुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील आर्थिक सहकार्याला चालना मिळण्याची शक्यता आहे आणि युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील धोरणात्मक संबंधांना अधिक आकार मिळण्याची शक्यता आहे.

मोदी यांच्या फ्रान्स भेटीला विशेष महत्त्व आहे कारण दोन्ही राष्ट्रे त्यांच्या धोरणात्मक भागीदारीची २५ वर्षे साजरी करत आहेत.

Bastille Day Parade 2023
New York Flood: रस्ते ब्लॉक, कार बुडाल्या अन् उड्डाणे रद्द; न्यूयॉर्कमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही मिळाला होता सन्मान

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी फ्रान्सला जाणार आहेत.

2009 मध्ये मनमोहन सिंग यांच्यानंतर बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ते दुसरे भारतीय पंतप्रधान असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com