Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेनंतर PM Modi लगेच 'या' देशाचा दौरा करणार, भारताला होणार मोठा फायदा!

PM Modi Egypt Tour: भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी अमेरिकेला भेट देणार आहेत.

Manish Jadhav

PM Modi Egypt Tour: भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी अमेरिकेला भेट देणार आहेत, जिथे त्यांना व्हाईट हाऊसचे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि पीएम मोदी यांच्या या भेटीत संरक्षण, आशियातील चीनच्या वाढत्या वर्चस्वावर नियंत्रण आणि इतर अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होईल.

त्याचबरोबर, या भेटीचा संबंध अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांशी जोडला जात आहे, जिथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. मात्र, अमेरिकेनंतर लगेचच पीएम मोदी इजिप्तला भेट देणार आहेत, ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

पंतप्रधान मोदी इजिप्तला का जात आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) अमेरिकेनंतर लगेचच इजिप्तला रवाना होणार असून, ते 24 आणि 25 तारखेला इजिप्तमध्ये असतील. इजिप्तचा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या इजिप्त दौऱ्याला मंजूरी दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला इजिप्त दौरा आहे, जिथे ते 24 आणि 25 जून रोजी कैरोमध्ये असतील. इजिप्तने ब्रिक्स देशांचे सदस्यत्व स्वीकारले आहे. या घोषणेनंतरच हा दौरा निश्चित करण्यात आला आहे.

याचा फायदा भारताला होईल

पश्चिम आशियाई देश ब्रिक्स देशांशी व्यापार करतात. यादरम्यान व्यापारावरील डॉलरचा प्रभाव कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. डॉलर व्यापाराला पर्याय शोधला जात आहे, ज्यामध्ये इतर चलनांना मान्यता दिली जात आहे.

सध्या भारत (India) आणि इजिप्तचा व्यापार सुमारे $7 अब्ज आहे. ज्या प्रकारे भारतात आयआयटी सारख्या उच्च शैक्षणिक संस्था आहेत, इजिप्तलाही त्यांच्या देशात अशाप्रकारच्या उच्च शैक्षणिक संस्था सुरु करायच्या आहेत.

पश्चिम आशिया आणि आफ्रिकन देशांच्या राजकारणात इजिप्त अधिक मजबूत स्थितीत असल्याचे दिसते, त्यामुळे इजिप्तला भेट दिल्याने भारतासाठीही इतर अनेक मार्ग खुले होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT