PM Modi & Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून भारताला काय मिळणार? जाणून घ्या

PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा 21 जूनपासून सुरु होत आहे. पीएम मोदींचा हा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जात आहे.

Manish Jadhav

PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा 21 जूनपासून सुरु होत आहे. पीएम मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. केवळ भारत-अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष्य या दौऱ्याकडे आहे.

दुसरीकडे, पाकिस्तान आणि चीनची भांबेरी उडाली आहे. दोन्ही देश त्रस्त दिसत आहेत. तर पंतप्रधान मोदींच्या या भेटीतून भारताला काय मिळणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्याची चिंता पाकिस्तान आणि चीन का करतोय? चला तर मग सविस्तरपणे समजून घेऊया...

आधी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची माहिती घ्या

21 जून रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व करतील.

22 जून रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

22 जूनच्या संध्याकाळी, पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्यासोबत आयोजित केलेल्या स्टेट डिनरला उपस्थित राहतील.

22 जून रोजी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.

23 जून रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन पंतप्रधान मोदींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करतील.

पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमधील आघाडीच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

या दौऱ्यातून भारताला काय मिळणार?

1. आंतरराष्ट्रीय स्तरावर सामर्थ्य वाढेल: जगातील बलाढ्य देशांपैकी भारत हा एक देश आहे. तो कोणत्याही विकसीत देशांच्या कॅम्पमध्ये सामील झालेला नाही. असे असूनही प्रत्येक कॅम्पचा आवडता देश म्हणून भारत कायम आहे. भारताचे (India) रशियाबरोबरच अमेरिकेशीही चांगले संबंध आहेत. भारत एक जागतिक महासत्ता म्हणून वेगाने उदयास येत आहे.

अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला खास महत्त्व आहे. या राजकीय दौऱ्याचा संपूर्ण खर्च यजमान देशाकडून करण्यात येणार आहे. 21 जून रोजी योग दिनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी भारतीय संस्कृती आणि सभ्यता जगभर पोहोचवतील.

यानंतर त्यांची जो बायडन यांच्याशी भेट होईल. या बैठकीत भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक धोरणात्मक भागीदारीही होणार आहे. डिजिटल अर्थव्यवस्था, अंतराळ मोहीम, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये करार होणार आहेत. यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ताकद झपाट्याने वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संरक्षण उत्पादनांच्या खरेदीबाबतही दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो.

2. इंडो-पॅसिफिक महासागर क्षेत्राबाबत: प्रशांत क्षेत्र आशियाला पश्चिमेकडील देशांशी जोडते. येथे 50 हून अधिक लहान देश आणि बेटे आहेत. या भागात चीनचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पांतर्गत पापुआ न्यू गिनीजवळील सोलोमन बेटांसोबत सुरक्षा करारावर स्वाक्षरी केल्यानंतर चीनने राजधानी होनियारा येथे बंदर बांधण्याचे कंत्राट जिंकले.

दुसरीकडे, चीनच्या या हालचाली पाहता पापुआ न्यू गिनी बीजिंगकडे झुकत आहे, जी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या क्वाड ग्रुपसाठी मोठी चिंतेची बाब आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी 2022 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बँकॉकमध्ये भेट घेतली. त्यानंतर बीजिंगने सांगितले की, चीन आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही चांगले मित्र आहेत.

आता पाश्चिमात्य देशांनी इंडो-पॅसिफिक महासागर क्षेत्रातील देशांना एकत्र आणण्यासाठी भारताला पुढे केले आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले तेव्हा, तेथील पंतप्रधानांनी पीएम मोदींच्या पायाला स्पर्श करुन त्यांचे स्वागत केले.

याशिवाय, भारतीय पंतप्रधान प्रथमच इंडिया पॅसिफिक आयलंड को-ऑपरेशन अर्थात FIPIC च्या फोरममध्ये सामील झाले. याद्वारे त्यांनी भारतीय क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचालींना रोखण्याच्या दिशेने पहिले आणि मोठे पाऊल उचलले. पॅसिफिक क्षेत्रातील देश आणि बेटांनी पंतप्रधान मोदींचे ज्या प्रकारे स्वागत केले, तेही एक मोठा राजनैतिक संदेश देत आहे.

आता अमेरिकन दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्यात या विषयावर चर्चा होणार आहे. अमेरिकेची इच्छा आहे की, पंतप्रधान मोदींनी पॅसिफिक महासागर क्षेत्रासह इतर आशियाई देशांना एकत्र करुन त्यांचे नेतृत्व करावे. त्यामुळे चीनचा प्रभाव कमी होऊ शकतो.

3. मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची शक्यता: पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्यात अमेरिकेतील अनेक बड्या उद्योगपतींना भेटतील. उद्योगपतींसोबतच्या बैठकीत भारतातील गुंतवणुकीबाबतही चर्चा होणार आहे. या काळात मायक्रोन टेक्नॉलॉजी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा करु शकते, असे म्हटले जाते.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितली मोठी गोष्ट

पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्यही आले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी खास आहे. भारतीय पंतप्रधान दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

जयशंकर पुढे म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान एखाद्या देशाला भेट देतात, तेव्हा ते आपले (भारताचे) संबंध पुढे घेऊन जातात. मला समजते की, हे जागतिकीकरण झालेले जग आहे, त्यामुळे काही घडले तर त्याचा इतरांवर परिणाम होऊ शकतो किंवा होणार नाही. आम्ही आमच्या संबंधांच्या दृष्टीकोनातून, आमच्या स्वतःच्या हितासाठी पाहतो.

चीन आणि पाकिस्तान का चिंतेत आहेत?

जगात भारताच्या (India) वाढत्या धोक्यामुळे चीन आणि पाकिस्तान आधीच त्रस्त आहेत. एकीकडे पाकिस्तान अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे तर दुसरीकडे चीनही सातत्याने वादात अडकत आहे. अशा काळात भारत वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे दोन्ही देश चिंतेत आहेत. भारताचा विकास झाला तर जगात आपले महत्त्व संपेल, असे त्यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT