PM Modi US Visit: 180 हून अधिक देशांसोबत पीएम मोदी करणार 'योग', UN हेडक्वार्टरमध्ये आयोजन

PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा अतिशय खास असणार आहे. 21 जून हा जागतिक योग दिन आहे.
PM Modi
PM Modi Dainik Gomantak

PM Narendra Modi's US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा अतिशय खास असणार आहे. 21 जून हा जागतिक योग दिन आहे. यावेळी पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात असतील. योग दिनानिमित्त येथे भव्य कार्यक्रम होणार आहे. त्याचे नेतृत्व पंतप्रधान करणार आहेत.

तिथे मोठ्या संख्येने भारतीय नागरिकही उपस्थित राहणार आहेत. यासाठी पंतप्रधान एक दिवस अगोदर 20 जून रोजी अमेरिकेला रवाना होतील. योग दिनाच्या सेलिब्रेशननंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसीला जाणार आहेत.

दरम्यान, 22 जून रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेणार आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडन आणि त्यांची पत्नी आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडन व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधानांचे स्वागत करतील.

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष यांच्यात येथे उच्चस्तरीय बैठक होणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधानांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शाही भोजनामध्ये शेकडो पाहुणे - काँग्रेसचे सदस्य, राजनयिक अधिकाऱी, सेलिब्रिटी उपस्थित असतील.

PM Modi
PM Modi US Visit: अभिमानास्पद! व्हाइट हाउसच्या बाहेर फडकला तिरंगा, पंतप्रधान मोंदीच्या दौऱ्याची उत्सुकता शिगेला...

पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणार आहेत

दुसरीकडे, 22 जूनच्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अमेरिकन काँग्रेसला संबोधित करण्याचाही समावेश आहे. अमेरिकन काँग्रेसच्या मागणीनुसार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटच्या नेत्यांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिले होते.

यावेळी सभागृहाचे केविन मॅककार्थी आणि सिनेटचे चक शूमर उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी, 23 जून रोजी उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राज्य सचिव अँटनी ब्लिंकन यांनी त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले आहे.

चीनच्या आक्रमकतेवर चर्चा होऊ शकते

पंतप्रधानांचा बहुतांश वेळ जो बायडन यांच्यासोबत जाणार आहे. यादरम्यान दोन्ही नेते जागतिक राजकारण, रशिया-युक्रेन युद्ध, चीनची वाढती शक्ती, दहशतवाद, व्यापार आणि हवामान बदल अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करु शकतात.

त्यांच्या दौऱ्यात पंतप्रधान सीईओ, प्रोफेशनल्स, स्टेकहोल्डर्स यांच्याशी संवाद साधणार आहेत. ते भारतीय नागरिकांचीही भेट घेणार आहेत. यानंतर 24-25 जून दरम्यान पंतप्रधान इजिप्तला जाणार असून, हा त्यांचा पहिला दौरा असेल.

PM Modi
PM Modi America Visit: 'पीएम मोदींचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी आम्ही...,' अमेरिकन खासदार म्हणाले; पाहा व्हिडिओ

जी-20 बैठक आणि जो बायडन यांचा संभाव्य भारत दौरा

सप्टेंबर महिन्यात भारत G20 चे आयोजन करत आहे. याआधी दोन मोठ्या लोकशाही देशांच्या नेत्यांची बैठक महत्त्वाचा संदेश देऊ शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) भारतात येऊ शकतात, तेव्हा चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर जी-20 बैठक होणार आहे.

तर दुसरीकडे, पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात काही महत्त्वाची डील देखील होऊ शकते, ज्यामध्ये MQ-9 रीपर ड्रोनचा समावेश आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने 18 ड्रोन खरेदीला मंजूरी दिली आहे, परंतु अंतिम निर्णय संरक्षण अधिग्रहण परिषदेला घ्यायचा आहे. हा करार अंतिम होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com