Elon Musk meets PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांची भेट घेतली.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर मस्क म्हणाले की, 'मी मोदींचा फॅन आहे.' मस्क पुढे म्हणाले की, 'भारताच्या भविष्याबद्दल मी कमालीचा उत्साही आहे. जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे अधिक संभावना आहेत.
त्यांना (पीएम मोदी) खरोखरच भारताची (India) काळजी आहे, कारण ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यास प्रेरित करत आहेत.'
मस्क पुढे म्हणाले की, 'मी मोदींचा फॅन आहे. ही एक छान भेट होती आणि मला ते खूप आवडतात. मी म्हणू शकतो की त्यांना (पीएम मोदी) खरोखरच भारतासाठी काही गोष्टी करायच्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांना नवीन गुंतवणूकदारांना (Investors) पाठिंबा द्यायचा आहे, जेणेकरुन यामधून भारताचे हित साधले जाईल. पुढच्या वर्षी मी भारताला भेट देण्याचा विचार करत आहे.'
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींचे न्यूयॉर्कमध्ये शानदार स्वागत करण्यात आले. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत त्यांचे स्वागत केले.
तसेच, विमानतळावरुन मोदी लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये पोहोचले, जिथे भारतीय समुदायाचे लोक सकाळपासून त्यांची वाट पाहत होते. यावेळी, समुदयातील काही लोक 'मोदी जॅकेट' घातलेले दिसले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या निमंत्रणावरुन आलेले पंतप्रधान मोदी 24 जूनपर्यंत अमेरिकेतच राहणार आहेत.
22 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्यासाठी स्टेट डिनरचे आयोजन करतील. या दौऱ्यात 22 जून रोजी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्राला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.