Sabrina Siddiqui Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi यांना नडणारी पत्रकार होतेय ट्रोल; बायडन सरकार म्हणाले, "आम्ही हे सहन करणार नाही"

Sabrina Siddiqui: जीन-पियरे म्हणाले की अमेरिका वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध आहे, म्हणूनच संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Ashutosh Masgaunde

Sabrina Siddiqui Questions to PM Modi: वॉल स्ट्रीट जर्नलची रिपोर्टर सबरीना सिद्दीकी सध्या ऑनलाइन खूप ट्रोल होत आहे. ही तीच पत्रकार आहे, जिने गेल्या आठवड्यात जो बिडेन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत प्रश्न विचारला होता.

याशिवाय सिद्दीकी यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याबद्दल विचारले होते.

हा ट्रोलिंगचा प्रकार समोर आल्यानंतर व्हाइट हाउसचे प्रवक्ते तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे समन्वयक जॉन किर्बी, यांनी ऑनलाइन ट्रोलिंगचा निषेध केला आहे. हा प्रकार पूर्णपणे अस्वीकार्य असून, तो सहन केला जाणार नाही, असे म्हटले आहे.

व्हाइट हाउसमधील पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारताना, पत्रकार सबरीना सिद्दीकी

संयुक्त पत्रकार परिषदेच्या एका दिवसानंतर रिपोर्टर सिद्दीकी यांच्यावर काही लोकांनी आरोप केले आणि त्यांना 'पाकिस्तानी इस्लामिस्ट' म्हटले.

यामध्ये खासकरुन भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात होते.

आमच्या पत्रकाराचा ट्रोलिंगच्या माध्यमातून छळ होत असल्याच्या बातम्या समोर आल्याचे आम्ही पाहत आहे. हा प्रकार पूर्णपणू अस्वीकार्य आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत पत्रकारांचा छळ सहन करणार नाही. याचा आम्ही निषेध करतो. हे लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.
जॉन किर्बी, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे समन्वयक
आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध आहोत, म्हणूनच आम्ही गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. आम्ही निश्चितपणे एखाद्या पत्रकाराला धमकावण्याच्या किंवा त्रास देण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचा निषेध करतो. ती फक्त तिचे काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.
करिन जीन-पियरे, प्रेस सेक्रेटरी व्हाईट हाऊस

जीन-पियरे म्हणाल्या की अमेरिका वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध आहे, म्हणूनच संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, दक्षिण आशियाई पत्रकार संघाने (SAJA) सिद्दीकी यांच्यावर झालेल्या ऑनलाइन गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

पंतप्रधान मोदींना विचाराला होता हा प्रश्न

खरं तर, सबरीना यांनी पंतप्रधान मोदींना भारतातील अल्पसंख्याकांसोबत कथित भेदभावाबाबत प्रश्न विचारला होता. मात्र, त्याच दिवसापासून ती सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली.

पंतप्रधान मोदींना प्रश्न करत त्या म्हणाल्या की, भारत स्वत:ला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानतो पण तुमच्या सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांशी भेदभाव केला आहे आणि टीका करणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे.

अशा परिस्थितीत, तुमच्या देशातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांचे अधिकार सुधारण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यासाठी तुम्ही आणि तुमचे सरकार कोणती पावले उचलत आहात?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT