Tomio Mizokami meets PM Narendra Modi Dainik Gomantak
ग्लोबल

Tomio Mizokami: जपानी प्रोफेसरची PM मोदींना गळ; हिंदी साहित्य संमेलन जपानमध्ये भरवण्याची विनंती

G-7 Summit: डॉ. टोमियो मिझोकामी अस्खलित हिंदी आणि पंजाबी बोलू शकतात. याशिवाय भारताकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Manish Jadhav

Tomio Mizokami: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ च्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिरोशिमा, जपान येथे आहेत. यादरम्यान त्यांनी हिरोशिमा येथे प्रसिद्ध जपानी लेखक डॉ. टोमियो मिझोकामी यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी पुढचे हिंदी साहित्य संमेलन जपानमध्ये भरवण्याची विनंती केली. डॉ. टोमियो मिझोकामी अस्खलित हिंदी आणि पंजाबी बोलू शकतात. याशिवाय भारताकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

प्रोफेसर टोमियो मिझोकामी कोण आहेत?

प्रोफेसर टोमियो मिझोकामी हे पद्म पुरस्कार विजेते, प्रतिष्ठित हिंदी आणि पंजाबी भाषातज्ज्ञ आहेत. जपानमधील (Japan) लोकांमध्ये भारतीय संस्कृती आणि साहित्य लोकप्रिय करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.

बैठकीदरम्यान, मिझोकामी यांनी पंतप्रधान मोदींना पुढील 'जागतिक हिंदी परिषद' जपानमध्ये आयोजित करण्यासाठी गळ घातली आहे.

अशी वाढली हिंदीची आवड

मिझोकामी यांचा जन्म जपानच्या कोबे शहरात झाला. त्यावेळी या शहरात भारतीयांची लोकसंख्या जास्त होती. त्यामुळे बालपणी त्यांच्या कानावर सतत भारतीय भाषा पडायच्या. त्यातूनच त्यांची भारतीय भाषांबद्धलची आवड वाढत गेली.

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे चाहते

मिझोकामी हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मोठे चाहते होते. नेहरुंच्या अलिप्तवादी चळवळीची मिझोकामी यांना मोठी भुरळ होती. ते म्हणतात, त्या काळात नेहरूंचा लक्षणीय जागतिक प्रभाव होता.

अलिप्तवादी चळवळीचे (NAM) संस्थापक नेहरू हे आम्हा तरुणांसाठी प्रेरणास्थान होते ज्यांना केवळ स्थिरता आणि शांतता हवी होती.

२०१८ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मान

२०१८ मध्ये, ओसाका विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. टोमियो मिझोकामी यांना साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मिळाला. हिंदी आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या 'अतुट सेवे'ची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मिझोकामी यांना २००१ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने 'हिंदी रत्न' देऊन गौरविले होते.

अलाहाबादमध्ये हिंदी शिकले

८१ वर्षांच्या मिझोकामी यांनी आपले आयुष्य भारत आणि जपान (ओसाका) मध्ये हिंदीचा अभ्यास, संशोधन आणि शिकवण्यात घालवले आहे. त्यांचा जन्म १९४१ मध्ये झाला.

पदवीनंतर त्यांनी अलाहाबादमध्ये १९६५ ते १९६८ या काळात हिंदी शिकले. याच काळात त्यांनी बंगाली शिक्षणही घेतले. वर्षाच्या शेवटी, ते जपानला परतले आणि ओसाका विद्यापीठात हिंदी विभागात संशोधन सहकारी म्हणून काम करू लागले.

मिझोकामी यांनी दिल्ली विद्यापीठातून (DU) हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. १९८३ मध्ये त्यांनी हिंदी विषयात पीएच.डी. पूर्ण केली.

भारतीय भाषांचे संवर्धन

मिझोकामी यांनी अमेरिकेत (America) भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी मोहीम चालवली आहे. १९८९ ते १९९० पर्यंत त्यांनी शिकागो विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाला व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून भेट दिली. यादरम्यान त्यांनी पंजाबीही शिकवले.

त्यांना वयाच्या ६५ व्या वर्षी ओसाका युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन स्टडीजचे 'प्रोफेसर एमेरिटस' म्हणून नाव देण्यात आले. मिझोकामी यांना १९९९ मध्ये लंडनमध्ये 'विश्व हिंदी सन्मान'सह इतर अनेक सन्मानही मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

Goa Live News: विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

SCROLL FOR NEXT