PM Modi पुन्हा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 78 टक्के अप्रूव्हल रेटिंगसह मारली बाजी!

PM Narendra Modi: जपानमध्ये होत असलेल्या G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Narendra Modi: जपानमध्ये होत असलेल्या G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. ते आता पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत.

'मॉर्निंग कन्सल्ट'ने जारी केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार, पीएम मोदींना 78 टक्के ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे. अशाप्रकारे, जगातील 22 देशांच्या नेत्यांना मागे टाकत ते या यादीत अव्वल स्थानी पोहोचले.

या लोकप्रिय नेत्यांच्या सूचीमध्ये पंतप्रधान मोदींसह स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एलेन बेर्सेट, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा समावेश आहे.

दरम्यान, 'मॉर्निंग कन्सल्ट'ने 10 मे ते 16 मे 2023 दरम्यान सर्वेक्षण केल्यानंतर हा रेटिंग अहवाल जारी केला आहे. या यादीत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) पहिल्या क्रमांकावर आहेत.

त्याचवेळी, दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अॅलेन बेर्सेट आहेत. त्यांना 62% अप्रूव्हल रेटिंग मिळाली. या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 62% अप्रूव्हल रेटिंग गुण देखील मिळाले. मात्र, त्यांना नाकारणाऱ्यांची संख्या जास्त राहिली.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी G 7 परिषदेला लावणार हजेरी

तसेच, ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज 53% रेटिंगसह चौथ्या आणि इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी 49% रेटिंगसह पाचव्या आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा 49% रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत.

PM Narendra Modi
PM Modi Meets Zelensky: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान PM मोदींनी घेतली झेलेन्स्की यांची भेट, जाणून घ्या

त्याचबरोबर, 'मॉर्निंग कन्सल्ट'च्या या अहवालात सुपर पॉवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची रेटिंग धक्कादायक आहे.

बायडन 42% रेटिंगसह 7 व्या स्थानावर आहेत. त्याचवेळी, ऋषी सुनक यांना टॉप 10 मध्येही स्थान मिळवता आले नाही. ते 33% रेटिंगसह 13 व्या स्थानावर आहेत. तर, इमॅन्युएल मॅक्रॉन 25% रेटिंगसह 20 व्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Modi government political challenge
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com