Pakistan's Prime Minister Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

PM साहेब इंडियाकडून काही तरी शिका; इम्रान खान यांचा यूजर्संनी घेतला क्लास

पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी टोकियो ऑलिम्पिकचा (Olympics) एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan's Prime Minister Imran Khan) यांना पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social media) 'अपमाना'चा सामना करावा लागला आहे. पंतप्रधान इम्रान यांनी टोकियो ऑलिम्पिकचा (Olympics) एक व्हिडिओ शेअर केला, आणि त्यामधून पाकिस्तानी खेळाडूंना ज्ञानाचे डोस पाजले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता न आल्यामुळे पाकिस्तानी सोशल मिडिया यूजर्संनी आपला राग थेट पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर काढला आहे.

काही वापरकर्त्यांनी इम्रान खान यांना देशातील औषधांच्या वाढत्या किमतींकडे लक्ष देण्यास सांगितले, तर कोणी खेळासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यास सांगितले. एवढेच नाही तर काही वापरकर्त्यांनी इम्रानला असेही सांगितले की त्याने ॲथेलिटिक्समध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या भारताकडून शिकले पाहिजे, मात्र पाकिस्तानला कांस्यपदकही जिंकता आले नाही.

इम्रान खान नेमकं काय म्हणाले

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर महिलांच्या शर्यतीचा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेदरलँडचा सिफान हसन धावताना सहकारी खेळाडूशी धडकते आणि पडते. पण ती लगेच उभी राहते अन् धावू लागते आणि त्यानंतर पात्रता शर्यतीत पहिले स्थान मिळवते. सिफान हसनने नंतर 1500 मीटर शर्यतीत कांस्यपदकही पटकावले. पात्रता शर्यतीचा व्हिडिओ शेअर करताना इम्रान यांनी लिहिले, 'पाकिस्तानी तरुणांनी ही शर्यत पाहावी आणि यामधून योग्य तो धडा घ्यावा अशी माझी इच्छा आहे - जेव्हा तुम्ही हार मानता तेव्हाच तुम्ही हरता.'

वापरकर्त्यांनी खान यांचा घेतला क्लास

मात्र दुसरीकडे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्हिडिओ शेअर करत तरुणांना दिलेला सल्ला त्यांना चांगलाच महागात पडला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की देशातील सरकारी कार्यक्रामासाठी लागणारा पैसा हा खेळासाठी वापरला पाहिजे.

दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, पुढील दशकाचे नियोजन करा आणि मला पुढील मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करू द्या. खान साहेब कोल्डप्लेचे गाणे वाजवल्याबद्दल कॉपीराइट कायद्यांतर्गत तुमचे ट्विटर तुमचे खाते सस्पेंड करतो.

एका व्यक्तीने सांगितले की, पाकिस्तानचे तरुण नव्हे तर क्रीडा महासंघांनी शिकण्याची गरज आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले की, 'सॉरी सर, मला अपेक्षित होते की तुम्ही ताल्हा तालिब किंवा अर्शद नदीम यांच्या स्तुती करणारे ट्विट कराल. खेळांच्या सर्वात मोठ्या मंचावर त्यांनी देशाचे नाव रोशन केले. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा करता येईल.

हाफिज नावाच्या वापरकर्त्याने लिहिले, 'तुम्ही भारताकडून शिकले पाहिजे, त्यांनी सुवर्णपदक जिंकले, पण पदकाशिवाय परतले. कांस्यसुद्धा मिळवता आले नाही.'' दुसऱ्या वापरकर्त्याने मजेशीरपणे लिहिले की, आधी तुमचे सोशल मीडिया अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तीला काढून टाका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

Rohit Sharma: 'बूम बूम' आफ्रिदीचा विक्रम विक्रम उद्ध्वस्त होणार? 'हिटमॅन' रोहित शर्मा बनणार 'सिक्सर किंग', फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

Goa Live News: पूजा नाईक 'नोकरीसाठी पैसे' प्रकरण: चौकशी अजूनही सुरू; आतापर्यंत आरोप सिद्ध झाले नाहीत: पोलीस महासंचालक

SCROLL FOR NEXT