PM Modi & Other World Leaders As Babies Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi & Other World Leaders As Babies: गोंडस लहानपण! नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील प्रसिद्ध नेत्यांचा AI Video व्हायरल

PM Modi & Other World Leaders: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सनच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे.

Manish Jadhav

PM Modi & Other World Leaders As Babies: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडओ व्हायरल होत असतात. अशातच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पहिल्यांदा थबकाल. होय खरंच... आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सनच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे. आधी हा व्हिडिओ पाहा...

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जागातील बडे नेते लहान असताना कसे दिसत असतील यासंबंधीचा आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनसह इतर अनेक प्रमुख नेते आहेत. व्हिडिओमध्ये या प्रतिमा एकामागून एक दिसत असून कॅप्शनमध्ये चित्रित नेत्याचे नाव लिहिले आहे.

व्हिडिओमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, पोप फ्रान्सिस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि इतर देखील आहेत. या व्हिडिओला X वर 145.3k पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या अकाऊंटचेच 1.9 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT