Pervez Musharraf  Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक

पाकिस्तानचे माजी माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याबाबत शुक्रवारी मोठी बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे माजी माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याबाबत शुक्रवारी मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. कर्करोगाने ते त्रस्त आहेत. 2001 ते 2008 या काळात मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष राहण्यासोबतच पाकिस्तानी लष्कराचे प्रमुखही राहिले आहेत. कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांना थेट जबाबदार धरले जाते. त्यांनी नवाझ शरीफ यांना पदच्युत केले होते. (pervez musharraf health former pakistan president pervez musharraf condition is critical ill for a long time)

न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली

पाकिस्तानचे (Pakistan) माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांना 2019 मध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील ते पहिले लष्करी शासक आहेत, ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांची हकालपट्टी करुन ते सत्तेवर आले होते. 2008 पर्यंत त्यांनी सत्ता सांभाळली.

2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) सरकारने नोव्हेंबर 2007 मध्ये घटनाबाह्य आणीबाणी लादल्याबद्दल माजी लष्करप्रमुखांविरुद्ध 2013 मध्ये देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अनेक न्यायाधीशांना तुरुंगात जावे लागले होते. तसेच 100 हून अधिक न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT