trans people  Dainik Gomantak
ग्लोबल

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

South American Country Peru: जगात ट्रान्सजेंडर, नॉन बायनरी आणि इंटरसेक्स लोकांबद्दल वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी मते आहेत.

Manish Jadhav

South American Country Peru: जगात ट्रान्सजेंडर, नॉन बायनरी आणि इंटरसेक्स लोकांबद्दल वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी मते आहेत. जगातील काही देशात त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यात आले, तर काही देशात त्यांचा आवाज दाबण्यात आला. त्यामुळे जगातील अनेक देश त्यांच्या हक्कांबद्दल कोणत्याही प्रकारची भीडभाड न बाळगता बोलतात. दरम्यान, एका देशातून अशी बातमी समोर आली आहे की, जी ऐकून तुम्हीही चकित व्हाल. दक्षिण अमेरिकन देश पेरुने एक मोठा निर्णय घेतला आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, पेरु देशाने अधिकृतरित्या ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी आणि इंटरसेक्स लोकांना 'मानसिकदृष्ट्या आजारी' म्हणून घोषित केले आहे. त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पेरुच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मानसिक आरोग्यासाठी वैद्यकीय सेवेचे संपूर्ण कव्हरेज देऊन, देशाच्या सार्वजनिक आरोग्य सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

LGBTQ+ आउटलेट पिंक न्यूजच्या रिपोर्टनुसार, ट्रान्स आणि इंटरसेक्स लोक मानसिकदृष्ट्या आजारी आहेत हे प्रतिबिंबित करण्यासाठी हा निर्णय आवश्यक आरोग्य विमा योजनेत बदल करेल. आउटलेटच्या रिपोर्टनुसार, आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा बदल असूनही ट्रान्स आणि इतर LGBTQ+ लोकांना कन्वर्जन थेरपी घेण्याची सक्ती केली जाणार नाही.

तथापि, देशभरातील LGBTQ+ समूहाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, हा निर्णय त्यांच्या हक्क आणि सुरक्षिततेसाठीच्या लढ्याला मागे खेचत आहे. लिमाच्या दक्षिण वैज्ञानिक विद्यापीठातील वैद्यकीय संशोधक पर्सी मायटा-ट्रिस्टन यांनी टेलिग्राफला सांगितले की, या निर्णयामुळे LGBTQ+ समस्यांबद्दल जागरुकता नसलेली दिसून येते. ते पुढे म्हणाले की, 'आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करु शकत नाही की हे अत्यंत पुराणमतवादी समाजात घडत आहे, जिथे LGBTQ समुदायाला कोणतेही अधिकार नाहीत. जिथे त्यांना मानसिकदृष्ट्या आजारी घोषित केल्याने कन्वर्जन थेरपीची दारे खुली होतील.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT