America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

America Crime News: अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील एका नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
America Crime News
America Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

America Crime News: अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील एका नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या नर्सवर 17 रुग्णांना प्राणघातक इन्सुलिनचा डोस देऊन ठार मारल्याचा आरोप आहे. खुनाच्या तीन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पिट्सबर्गच्या उत्तरेस 48 किलोमीटर अंतरावर असलेल्या बटलर येथे झालेल्या सुनावणीत 41 वर्षीय हिदर प्रेस्डी हिला सलग तीन जन्मठेपेची आणि 380-760 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला

दरम्यान, 2020 ते 2023 या कालावधीत चार काऊन्टींमधील पाच आरोग्य सेवा सुविधा केंद्रामध्ये राहणाऱ्या 17 रुग्णांच्या मृत्यूमध्ये तिने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वकिलांनी सांगितले. पीडितांचे वय 43 ते 104 वर्षे दरम्यान होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकाऱ्यांनी अनेकदा प्रेस्डीच्या वागणुकीवर सवाल उपस्थित केले होते. ते असे म्हणाले की, तिने अनेकदा तिच्या रुग्णांचा तिरस्कार केला आणि त्यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पण्या केल्या.

America Crime News
America Crime: अमेरिकेत पुन्हा एका भारतीयाचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईवर उठले प्रश्न; पहिल्या पत्नीने सांगितले...

19 प्रकरणांमध्ये दोषी

प्रेस्डीला खुनाच्या तीन गुन्ह्यांमध्ये आणि खुनाच्या प्रयत्नाच्या 19 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. मे 2023 मध्ये, सुरुवातीला तिच्यावर नर्सिंग होमच्या दोन रुग्णांना ठार मारल्याचा आणि तिसऱ्याला जखमी केल्याचा आरोप होता. पुढील तपासात तिच्यावर आणखी डझनभर आरोप झाले होते. फेब्रुवारीच्या सुनावणीदरम्यान, ज्यामध्ये वकिलांशी केलेल्या चर्चेत तिने सूचित केले की, तिला दोषी ठरवायचे आहे.

रात्रीच्या शिफ्टमध्ये इन्सुलिन दिले जाते

प्रेस्डीने रुग्णांना मोठ्या प्रमाणात इन्सुलिन दिल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला. ती सहसा रात्रीच्या शिफ्टमध्ये रुग्णांना इन्सुलिन द्यायची. तिचा नर्सिंग परवाना गेल्या वर्षी तात्काळ निलंबित करण्यात आला होता. न्यायालयाच्या (Court) कागदपत्रांनुसार, प्रेस्डीने एप्रिल 2022 ते मे 2023 दरम्यान तिच्या आईला संदेश पाठवला होता, ज्यामध्ये तिने विविध रुग्ण आणि सहकर्मचाऱ्यांशी तिच्या नाखुशीबद्दल नमूद केले होते. विशेष म्हणजे, तिने त्या संदेशात त्यांना संभाव्य हानी पोहोचवण्याबद्दल खुलासा केला होता. रेस्टॉरंट आणि इतर ठिकाणी भेटलेल्या लोकांबद्दलही तिने अशाच तक्रारी व्यक्त केल्या होत्या.

America Crime News
America Crime: 41 सेकंदात 100 राऊंड फायरिंग... सीट बेल्ट न लावलेल्या व्यक्तीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू

सरकारी वकिलांनी न्यायालयीन दस्तऐवजांमध्ये म्हटले आहे की, प्रेस्डीचा रुग्ण आणि कर्मचाऱ्यांशी (Employees) अपमानास्पद वागण्याचा इतिहास होता, ज्यामुळे तिच्याकडून राजीनामा घेण्यात आला होता. दस्तऐवजानुसार, 2018 च्या सुरुवातीस, प्रेस्डीने पश्चिम पेनसिल्व्हेनिया नर्सिंग होमसह अनेक ठिकाणी काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com