Stampede in Yemen capital Dainik Gomantak
ग्लोबल

Stampede in Yemen: यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; 79 जणांचा मृत्य

यमेनची राजधानी साना येथे एका धर्मादाय कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली

दैनिक गोमन्तक

Stampede in Yemen's Capital Kills at Least 79: यमेनची राजधानी साना येथे बुधवारी (19 एप्रिल) जकात वितरणाच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली.

एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 79 जणांचा मृत्यू झाला असुन शेकडो लोक जखमी झाले.

एका हुथी सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, सनाच्या बाब अल-यामन जिल्ह्यात चेंगराचेंगरीत किमान 79 लोक मारले गेले आणि 322 हून अधिक जखमी झाले.

हौथी अधिकार्‍यांनी गुरुवारी (20 एप्रिल) एपीला सांगितले की यमेनच्या राजधानीत पैसे वाटप कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीत 80 हून अधिक लोक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले.

यमेनची राजधानी साना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

  • रमजानच्या निमित्ताने जकात वितरित केली जात होती

हुथी अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्त माध्यम एजन्सी एपीला मृतांच्या संख्येची माहिती दिली. चेंगराचेंगरीशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती देण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहिती देताना, एपी प्रतिनिधीने सांगितले की ही घटना एका शाळेत घडली जिथे रमजानच्या (Ramadan) निमित्ताने जकात वितरित केली जात होती.

चेंगराचेंगरीनंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा सुरक्षा दल तैनात करण्यात आले. हल्ल्यातील मृतांचे नातेवाईक त्यांच्या नातेवाईकांच्या शोधात घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखले जात होते.

  • या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या 

यमेनच्या अंतर्गत मंत्रालयाने सबा न्यूज एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मृत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. पैसे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर अधिकाऱ्यांनीही चौकशीची मागणी केली आहे. मात्र हुथीच्या गृहमंत्रालयाने ठार झालेल्या आणि जखमींची नेमकी माहिती दिलेली नाही.

त्यांनी एवढेच सांगितले की काही व्यावसायिकांनी पैसे वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये एका मोठ्या कंपाऊंडमध्ये मृत लोकांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT