Paris Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Paris Shocking Video: पॅरिसमध्ये गोळीबार, दोन ठार तर अनेक जण जखमी; हल्लेखोराला अटक

Paris Shooting: पॅरिसमध्ये झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर या गोळीबारात 7 जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Paris Shooting: पॅरिसमध्ये झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर या गोळीबारात 7 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका 69 वर्षीय व्यक्तीने हा गोळीबार केला आहे. पॅरिसमध्ये झालेल्या गोळीबारातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. भरदिवसा गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, फ्रेंच टेलिव्हिजन नेटवर्क बीएफएम टीव्हीने शुक्रवारी सांगितले की, गोळीबारात आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक जखमी झाले आहेत. बंदूकधारी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांची पुष्टी करताना, शहराच्या अभियोजन कार्यालयाने सांगितले की, पॅरिसच्या (Paris) 10 व्या अरॉन्डीसमान बंदोबस्तात गोळीबार झाला, ज्यामध्ये चार जण जखमी झाले. या प्रकरणी एका 69 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

19 डिसेंबर: कॅनडात गोळीबारात 5 ठार

19 डिसेंबर रोजी रात्री उशिरा एका संशयिताने कॅनडातील (Canada) ओंटारियो येथील वॉन परिसरात एका इमारतीत गोळीबार केला होता. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि काही वेळातच त्यांनी 73 वर्षीय संशयित आरोपीला चकमकीत ठार केले होते.

23 नोव्हेंबर : अमेरिकेत गोळीबार, 10 ठार

23 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील (America) वॉलमार्ट स्टोअरमध्ये अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला होता. यामध्ये 10 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्लेखोरालाही ठार केले होते. ही घटना अमेरिकेतील व्हर्जिनियामधील चेसापीक येथे घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT