Graves  Dainik Gomantak
ग्लोबल

मुलींच्या कबरीला टाळं लावल्याचा फोटो पाकिस्तानातील नाही? धक्कादाक अपडेट आली समोर| Fact Check

आपल्या मृत मुलीवर बलात्कार होऊ नये यासाठी पालकांनी कबरीला टाळे लावून ठेवल्याचे ट्वीट मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील हॅरिस सुलताना यांनी केले होते.

Manish Jadhav

आपल्या मृत मुलीवर बलात्कार होऊ नये यासाठी पालकांनी कबरीला टाळे लावून ठेवल्याचे ट्वीट मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील हॅरिस सुलताना यांनी केले होते. मात्र ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले आहे. सुलताना यांनी माफी मागत सोशल मीडियावरुन हे ट्वीट डिलीट केले आहे. यातच, सोशल मीडियावर या घटनेसंबंधी फोटो व्हायरल झाले आहेत. (Fact Check)

दरम्यान, “पाकिस्तानने असा समाज निर्माण केला आहे की, लोक आता आपल्या मुलींवर बलात्कार होऊ नये म्हणून त्यांच्या कबरीवर टाळे लावत आहेत. जेव्हा तुम्ही बुरख्याचा संबंध बलात्काराशी जोडता, तेव्हा तो तुमच्या पाठोपाठ कबरीपर्यंत जातो,” असे सुलताना यांनी बुधवारी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते. मात्र, आता ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे, ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक इंग्रजी वृतपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र आता, फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेर यांनी फक्त हॅरिस सुलताना यांच्या ट्वीटवरुन बातमी केल्याचे मत व्यक्त केले. यादरम्यान, तुम्ही सदर मुलीच्या पालकाशी योग्य ती खातरजमा केली का? असा सवाल देखील यावेळी झुबेर यांनी विचारला. मुलींवरील बलात्कार रोखण्यासाठी पालक आपल्या मुलीच्या कबरीला टाळं लावत असल्याची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे आता समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT