General Sergei Surovikin Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: खूंखार! रशियाच्या नव्या जनरलची युक्रेनमध्ये दहशत; क्रूरतेच्या...

Russia Ukraine War News: युक्रेनविरुद्धच्या युद्धात पुतिन यांनी जनरल सर्गेई सुरोविकिन याला रशियन सैन्याची कमांड दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine War Updates: युक्रेनविरुद्धच्या युद्धात पुतिन यांनी जनरल सर्गेई सुरोविकिन याला रशियन सैन्याची कमांड दिली आहे. तो अतिशय कडक शिस्तीचा लष्करी अधिकारी मानला जातो. क्रिमियन ब्रिजवरील हल्ल्याच्या काही तासांनंतर त्याची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

दरम्यान, 56 वर्षीय सर्गेई सुरोविकिन (General Sergei Surovikin) याचा जन्म सायबेरियात झाला. त्याला जनरल आर्मगेडॉन (Means the Commander of Destruction) असेही म्हणतात. अफगाणिस्तान (Afghanistan), चेचन्या, ताजिकिस्तान आणि सीरियासारख्या (Syria) भीषण युद्धांमध्ये त्याने क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या होत्या.

सुरोविकिनची कारकीर्द अशी राहीली

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेचन्या युद्धात, सुरोविकिनने सार्वजनिकपणे सांगितले होते की, "एका मृत सैनिकासाठी तीन अतिरेकी मारले जातील". 2017 मध्ये सीरियातील लष्करी तुकड्यांचे नेतृत्व सुरोविकिन याच्याकडे होते, असे सांगितले जाते. त्याने बहुतेक प्रदेश ताब्यात घेतला होता.

दुसरीकडे, सप्टेंबर 2017 मध्ये त्याची रशियन एरोस्पेस फोर्सचे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सीरियातील अलेप्पो शहराला उद्ध्वस्त करणाऱ्या हवाई हल्ल्यांसाठी त्याला जबाबदार मानले जाते. विशेष म्हणजे, सुरोविकिन याला सीरियातील भूमिकेसाठी 'हिरो ऑफ द रशियन फेडरेशन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तसेच, रशिया (Soviet Union) मध्ये 1991 च्या सत्ताबदलादरम्यान लोकशाही समर्थक आंदोलकांच्या हत्येत सुरोविकिनचा सहभाग होता. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती, मात्र रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन यांच्या आदेशानुसार त्याची सुटका करण्यात आली होती.

सुरोविकिन किती प्रमाणात प्रभाव पाडेल?

शिवाय, असे मानले जाते की, रशियामध्ये (Russia) असे अनेक घटक आहेत की, जे युक्रेनविरुद्ध कठोर आणि आक्रमक पावले उचलण्याचा सल्ला देत आहेत. सुरोविकिन याच्याकडे कमांड सोपवणे या मागणीशी जोडले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT