Bomb Threat 6 Airports France Dainik Gomantak
ग्लोबल

बॉम्बच्या धमकीनंतर फ्रान्समध्ये दहशत, 6 विमानतळे आली खाली करण्यात; प्रशासनाकडून अलर्ट

Manish Jadhav

Bomb Threat 6 Airports France: फ्रेंच विमानतळांवर हल्ले होण्याच्या धमक्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. फ्रान्समधील सहा वेगवेगळी विमानतळे तात्काळ खाली करण्यात आली.

धमकीच्या ईमेलनंतर सहा फ्रेंच विमानतळे खाली करण्यात आली, असे पोलिस सूत्राने एएफपीला सांगितले. अलीकडच्या काळात फ्रान्सला मिळालेल्या धमक्यांची मालिका म्हणून विमानतळावरील या धमकीकडे पाहिले जात आहे.

खाली करण्यात आलेल्या विमानतळांमध्ये पॅरिसजवळील लिले, लियॉन, नॅन्टेस, नाइस, टूलूस आणि ब्यूवेस यांचा समावेश आहे. विमानतळावरील धोका ओळखून अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, मंगळवारी फ्रान्समधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेले व्हर्साय पॅलेस चार दिवसांत दुसऱ्यांदा सुरक्षेच्या कारणास्तव काही तासांसाठी बंद ठेवण्यात आला.

बॉम्बच्या धमक्यांनंतर शनिवारी पॅरिसच्या लुव्रे म्युझियम आणि व्हर्साय पॅलेसमधून व्हिजिटर्स आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.

पॅरिस पोलिसांनी (Police) सांगितले की, बॉम्बची लेखी धमकी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी संग्रहालयाची झडती घेतली. राष्ट्रीय पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, व्हर्साय पॅलेस बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

गेल्या शुक्रवारी, (13 ऑक्टोबर) इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने उत्तरेकडील अरास शहरात एका शिक्षकाची (Teacher) चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेनंतर फ्रान्समध्ये बॉम्बच्या इतर धमक्याही समोर आल्या आहेत. या घटनेनंतर फ्रान्समध्ये खबरदारी म्हणून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

प्रशासन सतर्क

शुक्रवारी शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने सतर्कता आणखी वाढवली असून सुरक्षा वाढवण्यासाठी सात हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

एका विद्यार्थ्याने पकडले जाण्यापूर्वी शाळेत चाकूने हल्ला करुन एका शिक्षकाची हत्या केली आणि इतर तीन जणांना जखमी केले, असे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा फ्रान्सवर काय परिणाम होईल याचीही सरकारला चिंता आहे. दरवर्षी 30-40 हजार व्हिजिटर्स लूवर संग्रहालयाला भेट देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT