Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

'तुमच्या मुलांचं लग्न होणार नाही'; इम्रान खान यांनी बंडखोर खासदारांना दिला शाप

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले आहे. एकीकडे विरोधकांनी इम्रान खान यांच्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणून अडचणी निर्माण केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले आहे. एकीकडे विरोधकांनी इम्रान खान यांच्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणून अडचणी निर्माण केल्या आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे 24 बंडखोर खासदारही नवी अडचण निर्माण करत आहेत. शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना इम्रान खान (Imran Khan) या बंडखोर नेत्यांना इशारा देताना दिसले. आपल्या भाषणात ते या बंडखोर खासदारांना उद्देशून म्हणाले, 'मी तुमच्यासाठी वडिलांसमान आहे. मी तुम्हाला माफ करण्यास तयार आहे.' खैबर पख्तूनख्वामधील मलाकंद जिल्ह्यातील दरगई तहसीलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी ही माहिती दिली. (Pakistan's Prime Minister Imran Khan has criticized the rebel MPs)

'बंडखोर खासदारांना माफ करुन परत बोलावण्यास तयार'

'मी माझ्या पक्षाच्या बंडखोर खासदारांना माफ करुन परत बोलावण्यास तयार आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. चोरांच्या बाजूने मतदान करुन खासदारांनी आपली सदसद्विवेकबुद्धीही विकली आहे, असेही ते म्हणाले. 'तुम्हाला लग्नसमारंभांना हजेरी लावणे कठीण होईल, तुमची मुले मोठी झाल्यावर तुमच्या मुलांचे लग्न होणार नाही,' असा इशारा देखील खान यांनी खासदारांना दिला. खान पुढे म्हणाले की, 'अल्लाहही आपल्या गुलामांना माफ करतो, मी तुम्हा सर्वांसाठी पित्यासारखा आहे, मात्र अल्लाहसाठी एवढी मोठी चूक करु नका. तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा.'

भारताने नेहमीच मुक्त परराष्ट्र धोरणाचे पालन केले: पंतप्रधान इम्रान

दुसरीकडे, जाहीर सभेत इम्रान खान यांनी भारताचे (India) तोंड भरुन कौतुक केले. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे देखील कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, "मी आज भारताला सलाम करतो. त्यांनी नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पुरस्कार केला. आज भारताची अमेरिकेशी युती आहे. दुसरीकडे रशियाकडून भारत तेलही खरेदी करत आहे. कारण भारताचे धोरण लोकांसाठी आहे.''

रशिया-युक्रेन संकटावर पंतप्रधान इम्रान यांनी EU वर टीका केली

यादरम्यान, भारताचे कौतुक करताना खान यांनी रशिया-युक्रेन संकटावर पाकिस्तानवर दबाव आणल्याबद्दल युरोपियन युनियनवरही टीका केली. ते म्हणाले, "युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर टीका करण्यासाठी पाकिस्तानवर त्यांनी दबाव आणला, परंतु दुसरीकडे भारताला बोलण्याचे त्यांनी टाळले."

अविश्वास प्रस्तावावर विचार करण्यासाठी नॅशनल असेंब्लीमध्ये बैठक बोलावली

विशेष म्हणजे इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाबाबत पाकिस्तानचे विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्याचबरोबर इम्रान यांच्या पक्षाचे अनेक खासदारही त्यांच्या विरोधात आहेत. या सगळ्यात इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर विचार करण्यासाठी 25 मार्च रोजी नॅशनल असेंब्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावात विरोधकांनी देशातील आर्थिक संकट आणि महागाईला इम्रान खान यांचे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT