पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा 'काऊंटडाऊन' सुरू?

पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय जनरल बाजवा आणि इतर तीन लेफ्टनंट जनरल यांनी घेतला आहे.
Imran Khan News
Imran Khan NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांना लवकरच पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. इम्रान खान यांच्या निरोपाची तारीख पाकिस्तानी लष्कराने निश्चित केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन (OIO) च्या बैठकीनंतर पाकिस्तानी लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. OIC ची ही बैठक 22 आणि 23 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये होणार आहे. लष्कराच्या वतीने असे म्हणणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचाही समावेश आहे. (Imran Khan News)

Imran Khan News
लाखो डॉलर्स हाताळणारे अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री अमेरिकेत पुसतायेत कॅब

पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय जनरल बाजवा आणि इतर तीन लेफ्टनंट जनरल यांनी घेतला आहे. बाजवा आणि लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांनी पंतप्रधान इम्रान खान यांचीही भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे चार उच्च अधिकारी आता इम्रान यांना कोणतीही संधी देऊ इच्छित नाहीत. शुक्रवारी इम्रान खान यांनी बाजवा यांची भेट घेतली. या बैठकीत पाकिस्तानमधील ओआयसी बैठक, बलुचिस्तानचे संकट तसेच इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लष्कर इम्रान खानवर का नाराज आहे?
पाकिस्तानचे (Pakistan) लष्कर अनेक कारणांमुळे इम्रान खान यांच्यावर नाराज आहे. आधी बाजवा यांनी इम्रान यांना विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा न वापरण्याची सूचना केली होती. असे असतानाही त्यांनी जेयूआय-एफचे नेते मौलाना फजलुर रहमान यांना डिझेल म्हणत त्यांचा अपमान करणे सुरूच ठेवले. यासोबतच इम्रान यांनी युक्रेनच्या संकटासाठी अमेरिका आणि युरोपीय संघाला विनाकारण घेरल्याचा रागही पाकिस्तानी लष्कराला आहे.

Imran Khan News
युक्रेन अन् रशियामधील युद्ध थांबेल का? पाचव्यांदा होणार चर्चेची बैठक

इम्रान खान यांच्या विरोधात मतदान करणार त्यांच्या पक्षाचे खासदार
इम्रान खान यांच्या पक्षातील अनेक खासदारांनीही अविश्वास प्रस्तावात इम्रान यांच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी 25 मार्च रोजी अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यापूर्वी इम्रान खान (Imran Khan) यांनी नॅशनल असेंब्लीचे बंडखोर सदस्य पक्षात परतल्यास त्यांना माफ करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाकडून लाच घेऊन या सदस्यांनी सरकारविरोधात चूक केली असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानी मीडियामध्ये (Media) इम्रानची जागा परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी घेणार अशी चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com