Russia Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Russian Foreign Minister Lavrov: रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी विचारला प्रश्न अन् हिना रब्बानी यांच्यासह संपूर्ण पाकिस्तान झाला खजील

आम्ही रशियासारखी मोठी शक्ती नाही. असे रब्बानी म्हणाल्या.

Pramod Yadav

Russian Foreign Minister Lavrov: समरकंदमध्ये रशिया आणि पाकिस्तानच्या बैठकीत हिना रब्बानी खार यांना अपमानाला सामोरे जावे लागले होते. हिना पाकिस्तानच्या उप परराष्ट्र मंत्री आहेत.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी द्विपक्षीय चर्चेसाठी त्या समरकंदला पोहोचल्या होत्या. भेटीदरम्यान, हिना रब्बानी खार त्यांच्या टीमशिवाय एकट्याच सर्गेई लावरोव यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेसाठी गेल्या होत्या.

यादरम्यान लावरोव्ह यांनी हिना रब्बानी यांना त्यांच्या टीमच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारला. यावर हिना रब्बानी खार खजील झाल्या आणि त्यांनी संभाषण अपूर्णच सोडले.

पाकिस्तान आपल्या डबघाईला आलेली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी रशियाकडून स्वस्त तेल विकत घेण्याच्या तयारीत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानने रशियाकडून गहू खरेदी करण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

एका वृत्तानुसार, हिना रब्बानी खार आणि सर्गेई लावरोव राजनयिक चर्चेसाठी बसले होते. लव्हरोव्ह यांच्यासोबत रशियन प्रतिनिधींची संपूर्ण टीम होती, तर हिना रब्बानी खार टेबलच्या एका बाजूला एकट्या बसल्या होत्या. यावर लॅवरोव्हने विचारले, तुझी बाकीची टीम कुठे आहे?

यावर हिना रब्बानी म्हणाल्या की, आमची छोटी टीम आहे बाकीची टीम नंतर येईल. आम्ही एका छोट्या टीमसोबत प्रवास करत आहोत आणि आमचा इथे एक छोटा दूतावासही आहे. आम्ही रशियासारखी मोठी शक्ती नाही. असे रब्बानी म्हणाल्या.

हिना रब्बानी खार यांना उत्तर देताना लावरोव म्हणाले की, मित्रांना अशा गोष्टींनी काही फरक पडत नाही. आम्ही नम्र राहतो. आम्ही मित्र आहोत आणि मित्रांना टीमच्या आकाराची पर्वा नाही.

पाकिस्तान आणि रशियामध्ये स्वस्त तेलाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. पाकिस्तान रशियाकडून तेल खरेदीसाठी अधिक सवलतींची मागणी करत आहे.

मात्र, रशिया यापेक्षा स्वस्त तेल विकण्यास तयार नाही. रशियाकडून तेल विकत घेतल्यास अमेरिका नाराज होण्याचा धोकाही पाकिस्तानला आहे.

दिवाळखोरी टाळण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीची गरज आहे, ज्यावर अमेरिकेचे मोठे नियंत्रण आहे.

तालिबान शासित अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 13 एप्रिल 2023 रोजी समरकंद शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याच निमित्ताने पाकिस्तान आणि रशियाची स्वतंत्र द्विपक्षीय बैठकही झाली.

या शिखर परिषदेला चीन, इराण, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मात्र, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व हिना रब्बानी खार यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT