Pakistan Minister Mohsin Naqvi Car Video Danik Gomantak
ग्लोबल

VEDIO: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की..! लंडनमध्ये गृहमंत्र्यांची गाडी अडकून पोलिसांनी केली तपासणी; काय नेमकं घडलं?

Pakistan Minister Mohsin Naqvi: ब्रिटिश पोलिसांनी गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या कारला थांबवून तपासणी केली, त्या वेळचा व्हिडिओही समोर आला.

Manish Jadhav

Pakistan Minister Mohsin Naqvi Car Video: पाकिस्तानच्या नागरिकांवर, मग ते सामान्य नागरिक असोत वा मोठे मंत्री, जगाचा फारसा विश्वास नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या गोष्टीला दुजोरा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी हे लंडन दौऱ्यावर असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या गाडीला थांबवून तिची कसून तपासणी केली.

गृहमंत्री मोहसिन नक्वींच्या कारची तपासणी

ब्रिटिश पोलिसांनी गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या कारला थांबवून तपासणी केली, त्या वेळचा व्हिडिओही समोर आला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ही तपासणी केवळ एक साधी 'नियमित तपासणी' नव्हती. पोलिसांनी नक्वी यांच्या कारची प्रत्येक बाजूने आणि अतिशय बारकाईने तपासणी केली. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणि जगातील इतर देश पाकिस्तानी नागरिकांकडे कोणत्या नजरेने पाहतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

नेमकी घटना कधी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना त्या वेळी घडली जेव्हा मंत्री मोहसिन नक्वी ब्रिटिश अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले होते. मोहसिन नक्वी हे फेब्रुवारी 2024 पासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष (Chairman) देखील आहेत. त्यांनी जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत पंजाबचे कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. याशिवाय, नक्वी हे सिटी मीडिया ग्रुपचे संस्थापक देखील आहेत.

मोहसिन नक्वी यांची ही तपासणी म्हणजे पाकिस्तान्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अपमानास्पद घटनांच्या मालिकेतील नवीन कडी आहे. पाकिस्तानातील लोक अनेकदा आपापसातही एकमेकांची खूप फजिती करतात. नुकतेच एका पाकिस्तानी खासदाराने सेनाप्रमुख आसिम मुनीर यांना थेट 'सेल्समन' म्हणून हिणवले होते.

यापूर्वी, याचवर्षी मार्चमध्ये तुर्कमेनिस्तानमध्ये नियुक्त केलेले पाकिस्तानचे राजदूत अहसान वगान यांचाही अमेरिकेत अपमान झाला होता. वगान यांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांना विमानतळावरुनच माघारी पाठवण्यात आले होते. मोहसिन नक्वी यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीची सार्वजनिकरित्या तपासणी होणे, हे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानला (Pakistan) मिळणाऱ्या वागणुकीचे एक स्पष्ट उदाहरण मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT