Pakistan Viral Food Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: पाकड्यांचा काय नेम नाय! इंजिन ऑइलमध्ये ऑम्लेट बनवताना दिसला पाकिस्तानी? व्हिडिओ होतोय व्हायरल

Pakistan Viral Food Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Manish Jadhav

Pakistan Viral Food Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती इंजिन ऑइलमध्ये ऑम्लेट बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचा दावाही केला जात आहे. या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधले आहेच, पण अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही लोक या व्हिडिओला विनोद किंवा प्रसिद्धीचा स्टंट मानत आहेत, तर काहीजण याला धोकादायक आणि अस्वीकार्य म्हणत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा

पाकिस्तानी माणसाने इंजिन ऑइलमध्ये ऑम्लेट बनवले?

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर एक माणूस ऑम्लेट बनवताना दिसतो. असा दावा केला जात आहे की, तो ऑम्लेट बनवण्यासाठी सामान्य तेलाऐवजी इंजिन ऑइल (मोटर ऑइल) वापरत आहे. तेलाचा रंग गडद आणि जाड दिसतो, जो इंजिन ऑइलसारखा दिसतो. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, "पाकिस्तानी इंजिन ऑइलमध्ये ऑम्लेट बनवतात.''

लोक ते इंजिन ऑइल असल्याचा दावा करतात

तथापि, याबद्दल विचारले असता, @Grok ने उत्तर दिले की, ते कदाचित जास्त वापरलेले वनस्पती तेल आहे, इंजिन ऑइल नाही. पाकिस्तानमधील (Pakistan) स्ट्रीट फूड विक्रेते अनेकदा खर्च कमी करण्यासाठी खायचे तेल पुन्हा वापरतात, ज्यामुळे ते इंजिन ऑइलसारखे दिसते आणि ते काळे आणि खराब होते.

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडिओ @Incognito_qfs नावाच्या अकाउंटवरुन X या सोशल साइटवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, 5.5 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला असून 5100 लोकांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करुन आपली प्रतिक्रियाही दिली आहे. एका यूजरने कमेंट केली की, "खाण्यासाठी इंजिन ऑइल वापरणे हे जीवघेणे ठरु शकते?" तर दुसऱ्याने म्हटले की, "कदाचित हे नवीन 'डिलक्स ऑम्लेट' असेल!" तर दुसरीकडे, अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की हा व्हिडिओ खरा आहे की तो फक्त सोशल मीडियावर (Social Midea) व्हायरल करण्यासाठी बनवलेला स्टंट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teen Steals ₹95 Lakh:बाबांचा मृत्यू, आई दिल्लीत असताना लहान मुलाने घरातून चोरी केले 95 लाख, मित्रासोबत निघाला होता गोव्याला; विमानतळावर घेतले ताब्यात

Goa Assembly Live: जेव्हा हे सर्व नेते सत्तेत होते तेव्हा 'मूक आणीबाणी' सारखी परिस्थिती होती," युरी आलेमाओ

टेनिस क्वीन व्हीनस विल्यम्सची कमाल! 22 वर्षांनी लहान खेळाडूला नमवून जिंकला सामना; अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी सर्वात वयस्कर खेळाडू

Goa Assembly Session: जयंतीदिवशी लोकमान्य टिळकांना गोवा विधानसभेत अनोखी आदरांजली, वास्कोच्या आमदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी क्षणात केली मान्य 

Goa Cricket Stadium:गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार का नाही? 7 वर्षापासून GCA ची चालढकल; जमीन काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

SCROLL FOR NEXT