
Viral Song 2025: दरवर्षी आपण 31 डिसेंबर रोजी जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने करतो. एवढचं नाहीतर आशा करतो की नवीन वर्ष खूप सुखाचे आणि समाधानाचे जावो. 2025 वर्षाचे स्वागत आपण याच आशेने केले. आता अर्धे वर्ष उलटले. यादरम्यान अशा अनेक घटना घडल्या, ज्यांची आपण कोणीही कल्पनाही केली नव्हती. आता एका पठ्ठ्याने या घटनांवर एकत्रित गाणे बनवले, जे सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे. चला तर मग त्या व्यक्तीने गाण्यात कोणत्या घटनांचा समावेश केला ते जाणून घेऊया...
दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या सुरुवातीला तो व्यक्ती लोकांना विचारत आहे की, त्यांनी 2025 मध्ये काय पाहिले. तो म्हणतो, वेळेपूर्वी पावसाने हजेरी लावली. आपण मे महिन्यात जून पाहिला, म्हणजेच तो अति उष्णतेबद्दल बोलत आहे. त्यानंतर तो हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येबद्दल बोलतो. पुढे गाण्यात तो पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दलही बोलतो. त्यानंतर तो भारताच्या (India) प्रतिसादाचा म्हणजेच 'ऑपरेशन सिंदूर'चाही उल्लेख करतो. इतकेच नाही तर तो गाण्यात ड्रम हत्याकांडाचाही उल्लेख करतो. तो आरसीबी फायनल आणि शेवटी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबद्दलही बोलतो.
तुम्ही आत्ताच ऐकलेले गाणे इन्स्टाग्रामवर (Instagram) गरमकलाकर नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, '2025 आधा अभी बाकी है, बस कर खुदा इतना अभी काफी है.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत 62 लाख 46 हजारांहून अधिक लोकांनी गाणे लाईक केले आहे. गाणे ऐकल्यानंतर लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले. त्यांनी वेगवेगळ्या इमोजीद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.