Pakistan Finance Minister Ishaq Dar Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Finance Minister Ishaq Dar Video: पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी पत्रकाराला लगावली थप्पड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Pakistan Finance Minister Ishaq Dar: पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांच्यावर एका पत्रकाराला थप्पड मारल्याचा आरोप आहे.

Manish Jadhav

Pakistan Finance Minister Ishaq Dar: पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांच्यावर एका पत्रकाराला थप्पड मारल्याचा आरोप आहे. पत्रकाराने आरोप केला आहे की, जेव्हा त्याने दार यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्यांचा संयम गमावला आणि मला थप्पड मारली.

ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकाराने अर्थमंत्री दार यांना गुरुवारी पाकिस्तानी संसद भवनात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारला होता.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओची पुष्टी झालेली नाही. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अर्थमंत्री इशाक दार नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनाला संबोधित केल्यानंतर बाहेर जात आहेत, तेव्हा शाहिद कुरेशी नावाच्या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारत असताना मंत्री उत्तर न देता पुढे जात होते.

दुसरीकडे, IMF कडून US$ 1.1 बिलियन करार सुरक्षित करण्यात सरकारच्या (Government) अपयशावर पत्रकाराने दार यांना प्रश्न केला. तेव्हा दार यांनी उत्तर दिले की, 'करार होऊ शकत नाही कारण तुमच्यासारखे लोक व्यवस्थेत आहेत."

पत्रकाराने स्वतःचा बचाव करत म्हटले की, पत्रकार व्यवस्थेचा भाग नाही. आम्ही फक्त प्रश्न विचारतो. त्यानंतर ते तडक पत्रकाराच्या दिशेने आले आणि त्याला चापट मारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिपोर्टरने सांगितले की, मंत्र्याने मला थप्पड मारली आणि त्यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही मला धडा शिकवण्यास सांगितले.

तसेच, या घटनेनंतर पत्रकाराने (Journalist) मंत्र्याकडून छळ केल्याचा दावा करत घटनेचा व्हिडिओ जारी केला. दार यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना मोबाईल जप्त करुन फेकून देण्याच्या सूचना दिल्याचे अहवालात म्हटले आहे. मी दुसऱ्या मजल्यावर जाईपर्यंत दार यांच्या सुरक्षारक्षकांनी माझा पाठलाग केल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT