Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: 190 हिंदूंना भारतात जाण्यापासून पाक अधिकाऱ्यांनी रोखले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Pakistan PM Shehbaz Sharif: सिंध प्रांतात राहणाऱ्या 190 हिंदूंना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतात जाण्यापासून रोखले आहे.

Manish Jadhav

Pakistan: सिंध प्रांतात राहणाऱ्या 190 हिंदूंना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतात जाण्यापासून रोखले आहे. यामागचे कारण असे की, हे लोक कथितरित्या त्यांच्या शेजारी देशाला भेट देण्याच्या उद्देशाबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, सिंधच्या अनेक भागातून मुले आणि महिलांसह विविध हिंदू (Hindu) कुटुंबे मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली. त्यांच्याकडे व्हिसा होता आणि त्यांना तीर्थयात्रेसाठी भारतात जायचे होते.

हिंदूंना भारतात जाण्याचे कारण सांगता आले नाही

त्यांना भारतात (India) का जायचे आहे याचे योग्य कारण सांगता न आल्याने पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हिंदू कुटुंबे अनेकदा धार्मिक यात्रेच्या नावाखाली व्हिसा घेतात आणि नंतर दीर्घकाळ भारतात राहतात. सध्या मोठ्या संख्येने पाकिस्तानी हिंदू राजस्थान आणि दिल्लीत वास्तव्य करत आहेत.

'सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तान'च्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायाची लोकसंख्या 22,10,566 आहे, जी देशातील एकूण नोंदणीकृत लोकसंख्येच्या 1.18 टक्के आहे. पाकिस्तानची नोंदणीकृत लोकसंख्या 18,68,90,601 आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानमधील बहुसंख्य हिंदू लोकसंख्या गरीब आहेत. त्यांना देशाच्या विधिमंडळात शून्य प्रतिनिधित्व आहे. बहुसंख्य हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात राहते, जिथे त्यांची संस्कृती, परंपरा आणि भाषा मुस्लिम रहिवाशांशी मिळती जुळती आहे. ते अनेकदा अतिरेक्यांच्या छळाची तक्रारही करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: सावर्शे सत्तरी येथे मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद

Goa Dams: ‘साळावली’, ‘अंजुणे’ची होणार दुरुस्‍ती! 58 कोटींचा निधी मंजूर; DPR तयार

Goa Politics: खरी कुजबुज; हाऊस फूल इस्पितळ

Goa Bad Roads: 1400 कोटी खर्च, पण रस्त्यावर खड्डेच; 'बीजेपीचे बुराक' मोहिमेत पालेकरांची टीका; रस्त्यांवर बसून केले आंदोलन

SCROLL FOR NEXT