Donald Trump Assassination Plot Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump Assassination Plot: मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला 27 वर्षांची कठोर शिक्षा; अमेरिकन कोर्टाचा मोठा दणका

Donald Trump Assassination Plot: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशातील सर्वोच्च अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला कोर्टाने तब्बल साडेसत्तावीस वर्षांची शिक्षा सुनावली.

Manish Jadhav

Donald Trump Assassination Plot: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशातील सर्वोच्च अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला कोर्टाने तब्बल साडेसत्तावीस वर्षांची शिक्षा सुनावली. ब्रुकलिनच्या फेडरल कोर्टाने 48 वर्षीय आसिफ मर्चंट याला 330 महिने म्हणजेच 27 वर्षे आणि 6 महिन्यांचा कारावास ठोठावला असून, अमेरिकेच्या न्याय विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या वृत्तास दुजोरा दिला.

न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, आसिफ मर्चंट हा इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा (IRGC) एक प्रशिक्षित एजंट होता. मार्च 2026 मध्ये एका फेडरल ज्युरीने त्याला सीमापार दहशतवाद पसरवणे आणि सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले, ज्यानंतर यूएस डिस्ट्रिक्ट जज एरिक आर. कोमिटी यांनी त्याला ही शिक्षा सुनावली.

दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच 2024 मध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला इराणी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मर्चंट अमेरिकेत दाखल झाला होता. अमेरिकेत (America) त्याने भाडोत्री मारेकऱ्यांना गोळा करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र एप्रिल 2024 मध्ये ज्या व्यक्तीशी त्याने संपर्क साधला, तो व्यक्ती अमेरिकन यंत्रणांचा खबरी निघाला. त्यानंतर तातडीने कारवाई करत यंत्रणांनी मर्चंटला बेड्या ठोकल्या.

खटल्यादरम्यान मर्चंटने त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमकीचा दबाव असल्याचा बनाव रचला, परंतु अमेरिकन प्रशासनाने त्याचे सर्व दावे फेटाळून लावले. अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी टॉड ब्लॅंच यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, देशाच्या सर्वोच्च नेत्यांवर किंवा नागरिकांवर होणारा कोणताही परदेशी दहशतवादी हल्ला कधीही खपवून घेतला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजीत मोठा राजकीय भूकंप! आमदार वीरेश बोरकर यांची पक्षातून हकालपट्टी; परब गटाचे विधानसभेला पत्र

खरी कुजबुज: बंटींची गोव्‍यात 'एन्‍ट्री'

Marathi Films At IFFI 2026: इफ्फीत मराठी सिनेमांचा डंका! भारतीय पॅनोरमात 7 चित्रपटांची निवड; 'आदि अनंत', 'देऊळ बंद 2'ची पर्वणी

School Harassment Case: शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मागे एकतर्फी प्रेमाचे खूळ; डिचोलीत संताप, संशयित शिक्षक अटकेत

Daily Horoscope: धनवान होण्याचा योग! जुनी गुंतवणूक देणार भरमसाठ रिटर्न, 'या' राशींसाठी बुधवार आर्थिक लाभाचा

SCROLL FOR NEXT