School Harassment Case: शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मागे एकतर्फी प्रेमाचे खूळ; डिचोलीत संताप, संशयित शिक्षक अटकेत

Bicholim Teacher Arrested: एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा मानसिक छळ आणि पाठलाग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली आहे.
Bicholim Teacher Arrested
School Harassment CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा मानसिक छळ आणि पाठलाग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली आहे. हा प्रकार डिचोली शहरातील एका नामांकित सरकारी अनुदानित खासगी शाळेत घडला.

संशयित शिक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. या प्रकारामुळे डिचोली शहरात खळबळ माजली आहे. संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून काल सोमवारी रात्री संशयित शिक्षकाला अटक केली.

Bicholim Teacher Arrested
Goa Politics: 'परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न'; CM सावंत यांचा विरोधकांवर आरोप

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अविवाहित असून, त्याच शाळेतील नववीतील विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम करत होता. या प्रेमातूनच तो गेल्या काही महिन्यांपासून तिचा मानसिक छळ करत असल्याचा तसेच तिचा पाठलाग करत असल्याचा आरोप आहे.

या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. व्यवस्थापनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बालहक्क कायद्याच्या कलम ८ (२) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ (२) अन्वये गुन्हा नोंद केला.

यापूर्वीही करण्‍यात आली होती तक्रार

त्‍या अल्‍पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी यापूर्वीही संशयित शिक्षकाविरोधात शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांनी ती मागे घेतली. व्यवस्थापनाने त्यावेळी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नसल्याची चर्चा आहे. तक्रार मागे घेण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Bicholim Teacher Arrested
Goa Government Decision: गोव्यात दुकाने, मॉल्स आता 24 तास सुरू राहणार! सरकारचा मोठा निर्णय; 3 वर्षांसाठी परवानगी

द्यायचा भेटवस्तू

संशयित शिक्षकाने विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध जुळवण्यासाठी शाळेतील अन्य काही विद्यार्थ्यांची मदत घेतल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. तसेच तिला मनगटी घड्याळ भेट दिल्याचेही उघड झाले आहे. ‘एनजीओ’च्या सहकार्याने पोलिसांनी शाळेत चौकशी केल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.