पाकिस्तानी लष्कराने या आठवड्याच्या सुरुवातीला अशांत बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांच्या छावण्यांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. लष्कराने सांगितले की, बुधवारी दहशतवाद्यांनी नौष्की आणि पंजगुर भागात लष्कराच्या छावण्यांवर हल्ला केला, परंतु सुरक्षा दलांनी चपळाईने कारवाई केली आणि त्यांना यशस्वीपणे परतवून लावले. या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत नऊ सैनिक आणि 20 दहशतवादी मारले गेल्याचे लष्कराच्या मीडिया अफेयर्स विंगने एका निवेदनात म्हटले आहे.
170 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा BLA दावा
बलुचिस्तान (Balochistan) लिबरेशन आर्मी (बीएलए) ने शुक्रवारी दावा केला की बलुचिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये सुमारे 170 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. BLA ने बुधवारी सांगितले की त्यांनी पंजगुर भागातील फ्रंटियर कॉर्प्स कॅम्पला लक्ष्य केले, जे अद्याप त्यांच्या नियंत्रणात आहे. बीएलएने सांगितले की, हलामजीद ब्रिगेडच्या फिदायनांनी पंजगुरमधील लष्करी छावणीला लक्ष्य केले आणि ते आपल्या ताब्यात घेतले. शत्रूची छावणी अजूनही फिदायनांच्या ताब्यात आहे.
पंजगुरमधील नागरिकांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोपही बीएलएने पाकिस्तानी लष्करावर केला आहे. तत्पूर्वी, मजीद ब्रिगेडच्या दुसर्या तुकडीने नुष्की येथील लष्करी मुख्यालयाला 20 तास लक्ष्य केले आणि ताब्यात घेतले, ज्यात अधिकाऱ्यांसह सुमारे 100 जवान मारले गेले.
2021 मध्ये बीएलएने केले 10 हल्ले
बीएलए गनिमी हल्ले करण्यासाठी ओळखले जाते. 2021 मध्ये बीएलएने किमान 10 हल्ले केले होते. 2020 मध्ये झालेल्या हल्ल्यात BLA ने 16 पाकिस्तानी (Pakistan) सैनिक मारले होते. बीएलए बलुचिस्तानच्या प्रदेशात अधिक सक्रिय आहे, परंतु पाकिस्तानच्या इतर भागातही त्यांच्या कारवाया आहेत. बीएलएची स्थापना अधिकृतपणे 2000 मध्ये झाली होती परंतु 1973 पासून स्वतंत्र बलुचिस्तानच्या लढ्यात सहभागी आहे. पाकिस्तान भारत आणि अफगाणिस्तान बीएलएला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत आहे, ज्याचा दोन्ही देश विरोध करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.