17 वर्षीय पत्नीचा शिरच्छेद करून पतीने काढला पळ

इराणमधील अहवाझ शहरातील कसाई स्क्वेअर येथे या व्यक्तीने आपल्या पत्नीचे डोके हातात घेवून पोज दिली उपस्थित लोकांनी त्याचे फोटो काढल्यानंतर तो पळून गेला.
man in Iran Ahvaz city has beheaded his 17 year old wife in front of people in Kasaei Square
man in Iran Ahvaz city has beheaded his 17 year old wife in front of people in Kasaei SquareDainik Gomantak
Published on
Updated on

इराणच्या अहवाझ शहरातील एका व्यक्तीने शनिवारी कसाई स्क्वेअरमध्ये लोकांसमोर आपल्या सतरा वर्षांच्या पत्नीचा शिरच्छेद केला. ही भयानक घटना 05 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली, जेव्हा त्याच्या भावासोबत आलेल्या माणसाने शहरातील चौकात अनेक लोकांसमोर आपल्या पत्नीचा शिरच्छेद केला आणि त्यानंतर तिचे डोके हातात घेऊन शहरात धिंड काढली. सोशल मीडियावरील व्हिज्युअल्समध्ये, हा पुरुष एका हातात पत्नीचे डोके आणि दुसऱ्या हातात चाकू धरलेला दिसत आहे.

या धक्कादायक घटनेचा महिला पत्रकार आणि महिला-हक्क कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर निषेध केला. पतीचा छळ टाळण्यासाठी ही महिला इराणमधून तुर्कीला पळून गेली होती, पण तिला तिच्या पतीने परत आणले होते. रोक्ना या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पती आणि त्याच्या साथीदार भावाला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.

वृत्तानुसार, शनिवारी दुपारी 3 वाजता या व्यक्तीने अहवाजमधील कसई चौकात आपल्या पत्नीचे डोके हातात घेवून ही भयानक पोज दिली होती. मात्र, काही वेळाने तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याचे फोटो काढल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि काही तासांनंतर त्या व्यक्तीला त्याच दिवशी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ‘कौटुंबिक समस्यां’मुळे त्याने पत्नीची हत्या केल्याचे त्या व्यक्तीने म्हटले आहे. पोलिसांनी एका घरातून महिलेचा मृतदेहही ताब्यात घेतला आहे.

'आज अहवाझमध्ये एक खून झाला आणि त्यानंतर, मारेकऱ्याने शहरातील एका रस्त्यावर त्याचे घृणास्पद कृत्य दाखविण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे लोकांचे मानसिक संतूलन बिघडले. पोलिसांच्या प्रयत्नांनी आणि आवश्यक न्यायालयीन आदेश जारी केल्याने, घटनेच्या काही तासांनंतर गुन्हेगारांची ओळख पटली आणि त्यांला अटक करण्यात आली. आरोपींवर निर्णायक आणि त्वरीत कारवाई केली जाईल,' असे या घटनेबद्दल बोलताना खुजेस्तान प्रांताचे मुख्य न्यायमूर्ती म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com