pakistani passport 
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानी असणं हा कलंक! जॉर्जियात प्रवेश करण्यापासून रोखलं, 12 तास कैदेत ठेवलं...'त्या' व्यक्तीने सांगितली आपबिती

Pakistani Citizen Mistreated Georgia Airport: पाकिस्तान सध्या आर्थिक हालाखीची परिस्थिती आहे. लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान नागरिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. असाच एक अनुभव पाकिस्तानी नागरिकाने रेडिटवर सांंगितला.

Manish Jadhav

पाकिस्तानात सध्या आर्थिक हालाखीची परिस्थिती आहे. लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान नागरिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे. असाच एक अनुभव पाकिस्तानी नागरिकाने रेडिटवर सांंगितला. त्याला कसे देशात प्रवेश करण्यासपासून रोखण्यात आले. वैध कागदपत्रे असूनही त्याला कसे अपमानित करण्यात आले याविषयी त्याने सविस्तररित्या सांगितले.

संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाने जॉर्जियाच्या कुतैसी विमानतळावर त्याच्यासोबत घडलेल्या एका अप्रिय घटनेचा खुलासा केला. त्याने दावा केला की, त्याला आणि त्याच्या मित्राला जॉर्जियामध्ये केवळ प्रवेशच नाकारण्यात आला नाहीतर विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांना 12 तास तुरुंगसारख्या खोलीत बंद करुन अपमानित केले.

रेडिटवर लांबलचक केलेल्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीने पाकिस्तानी नागरिकांना जॉर्जियाला प्रवास करु नका असे अवाहान केले. तो म्हणाला की, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी तो खूप उत्सुक होता, परंतु कुतैसी विमानतळावर उतरताच परिस्थिती दुःस्वप्नात बदलली. जॉर्जियामध्ये युएईच्या नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. ते येथे व्हिसाशिवाय 90 दिवस राहू शकतात. युएईचा निवासी परवाना असल्याने मला वाटले की, जॉर्जियामध्ये कोणत्याही अडचणीशिवाय प्रवेश मिळेल पण तसे झाले नाही.

‘तो पाकिस्तानी असल्याचे कळताच पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला’

रेडिट पोस्टनुसार, या पाकिस्तानी नागरिकाने (Citizan) विमानतळ अधिकाऱ्यांना तो आणि त्याचा मित्र पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगताच त्यांचे पासपोर्ट हिसकावून घेण्यात आले. एवढचं नाहीतर त्यांना एका कोपऱ्यात उभे करण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली, जे त्यांच्यासाठी खूप अपमानजनक होते.

जॉर्जियामध्ये प्रवेश नाकारला, कोणतेही कारण दिले नाही

यानंतर, दोघांनाही एका खोलीत नेऊन बंद करण्यात आले. 20 मिनिटांनंतर एक महिला अधिकारी आली आणि म्हणाली, तुम्हाला जॉर्जियामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तिला असे का? असे विचारले असता कोणतेही कारण देण्यात आले नाही. त्याच्याकडे सगळी कागदपत्रे होती. त्याने कोणतेही गैरवर्तन केले नाही. तरीही त्याला 12 तास गुन्हेगारासारखे बंद ठेवण्यात आले.

त्या व्यक्तीचा आरोप आहे की, जेव्हा त्याने पाकिस्तानी दूतावासाला फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याचा फोन हिसकावून घेतला. एवढेच नाहीतर यादरम्यान त्याला काहीही खायला किंवा प्यायला दिले गेले नाही.

‘मानसिक छळ आणि अपमान’

रेडिट पोस्टमध्ये त्याने लिहिले की, आम्ही विमान प्रवास, हॉटेल, कार भाडे आणि इतर अनेक गोष्टींसाठी आधीच पैसे दिले होते. आर्थिक नुकसानाव्यतिरिक्त आम्हाला मानसिक छळ आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्याच्या अनुभवावर अनेकांनी त्यांच्यासोबतचे असे अनुभव शेअर केले. एकाने लिहिले की, पाकिस्तानी असणे हा एक कलंक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT