Danish Kaneria Post Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानी क्रिकेटर म्हणतो, 'जगाला RSS सारख्या संघटनांची गरज'; नेटकऱ्यांनी दिला तिथं शाखा उघडण्यांचा सल्ला

Danish Kaneria Post: जात, धर्म आणि सीमेच्या पलिकडे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजसेवा करते, अशा शब्दात दानिश कानेरियाने आरएसएसचे कौतुक केले आहे.

Pramod Yadav

पाकिस्तान: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध नेत्यांनी यावेळी आरएसएसच्या कार्यक्रम आणि पथ संचलनात सहभाग नोंदवला. राष्ट्रीय नेते, अभिनेते, कार्यकर्त्यांनी या शुभप्रसंगी आरएसएसला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे आरएसएसवर पाकिस्तानमधूनही शुभेच्छा मिळाल्या आहेत.

हो! पाकिस्तानी क्रिकेटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण केल्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने आरएसएसला शुभेच्छा दिल्या असून, जगाला यासारख्या संघटनांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. समाजकार्याचे काम पुढे घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांना मी सलाम करतो असेही दानिशने म्हटले आहे.

“जगाला आरएसएस सारख्या अधिक संघटनांची गरज आहे. कोणत्याही कौतुकाशिवाय समाज सेवेसाठी संघटना झटत आहे. जगभरात मी त्यांचे काम पाहिले आहे. समाजाला मदत करतात, गरजूंना सहकार्य करतात आणि तरुणांना ताकद देतात. जात, धर्म आणि सीमेच्या पलिकडे जाऊन सेवा करतात. समाजसेवेचे काम पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक स्वंयसेवकाला मी सलाम करतो”, असे कानेरियाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कानेरियाची ही पोस्ट जवळपास चार लाख लोकांपर्यंत पोहोचली असून, अठरा हजाराहून अधिक नेटकऱ्यांनी त्याला लाईक केले आहे. तर, साडे तिनशे नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून, अनेकांनी कानेरियाला ट्रोल केले आहे.

नेटकऱ्यांनी कानेरियाला पाकिस्तानमध्ये शाखा उघडण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी त्याला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही, असे म्हणत ट्रोल केले आहे. एक पाकिस्तानी नागरीक आरएसएसला सपोर्ट करतोय? असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे. दरम्यान, कानेरियाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मिंगेल आरावजो माझा पाठलाग करत होता', हल्ल्यानंतर 15 व्या दिवशी रामा काणकोणकर बोलले, पोलिसांनी नोंदवला जबाब

Amit Shah Arvind Kejriwal In Goa: गृहमंत्री अमित शहा आणि आपचे अरविंद केजरीवाल शनिवारी गोव्यात

Goa News Live: केरी सत्तरी येसरपंचपदी नंदिता गावस यांची बिनविरोध निवड

"पाकिस्तानचा खात्मा करू, आता संयम दाखवणार नाही" लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा Video

Dhruv Jurel Celebration: भारतीय क्रिकेटचा नवा 'हिरो'! शतक ठोकल्यानंतर ध्रुव जुरेलचं दमदार 'बॅट-टू-रायफल' सेलिब्रेशन, Video Viral

SCROLL FOR NEXT