Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी इम्रान खानला मोठा झटका, न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

Former Prime Minister Imran Khan: पुढील महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे.

Manish Jadhav

Former Prime Minister Imran Khan: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच, पुढील महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानी न्यायालयाने ऑफिशियल सिक्रेट उघड केल्याप्रकरणी इम्रान खान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने ही माहिती दिली. पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांच्याव्यतिरिक्त, माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही 'सायफर' प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण सार्वजनिक गोपनीय दस्तऐवज आणि गोपनीय राजनयिक पत्रे (सिफर) बनवण्याशी संबंधित आहे. पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

दरम्यान, इम्रान खान यांनी 27 मार्च 2022 रोजी एका रॅलीत काही कागदपत्रे दाखवत दावा केला होता की, हे त्यांचे सरकार पाडण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय षड्यंत्र' असल्याचा पुरावा आहे. इम्रान खान आणि कुरेशी यांनी या कागदपत्रांचा वापर राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2023 मध्ये त्यांना आरोपी बनवण्यात आले होते. मात्र, दोघांनीही स्वत:ला निर्दोष घोषित केले होते.

इम्रान यांच्या पक्षाचे म्हणणे काय?

रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी हा निकाल दिला. खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने या घडामोडीची पुष्टी केली. पक्षाने म्हटले की, ते "खोटे प्रकरण" असल्याचे सांगितले. मीडिया किंवा जनतेला यापासून दूर ठेवण्यात आले. त्यांच्या पक्षाने व्हॉट्सॲप संदेशात म्हटले की, ''आमची कायदेशीर टीम या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीसाठी दोनदा कार्यवाही स्थगित केली आणि मीडिया आणि सार्वजनिक प्रवेश टाळण्याचे आदेश दिले. न्यायालयाकडून घाईघाईने निर्णय घेण्यात आला. अशा स्थितीत वरील वस्तुस्थिती लक्षात घेता शिक्षेला स्थगिती मिळणे अपेक्षित आहे.''

इम्रान यांच्या पक्षावर बंदी येऊ शकते: रिपोर्ट

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, इम्रान खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा पक्ष 'पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय) वर बंदी घातली जाऊ शकते. सध्या प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये पीटीआयचे संस्थापक आणि इतर नेत्यांचा निकाल आल्यानंतर पीटीआयवर बंदी घालणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या निधीबाबत अनेक वर्षांच्या चौकशीनंतर, ऑगस्ट 2003 मध्ये पक्षाला 'बेकायदेशीर निधी' मिळाल्याची एकमताने घोषणा केली. यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) च्या नेतृत्वाखालील पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) सरकारला पक्ष विसर्जित करण्याची संधी मिळाली. 'जिओ न्यूज'च्या रिपोर्टनुसार, खान यांना संसदेतून अपात्र ठरवण्यात आले.

तसेच, 9 मे 2023 रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी खान यांना अटक केल्यानंतर इस्लामाबादमध्ये हिंसक निदर्शने झाली. खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयासह 20 हून अधिक लष्करी कार्यालयांना आग लावण्यात आली. 9 मे रोजी समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर पक्ष अडचणीत आला होता. हल्ल्यानंतरच्या काही दिवसांत शेकडो दंगलखोरांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर विविध आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

Tourist Safety: पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; हॉटेल नोंदणीचे नियम बदलले! आता 'Fire NOC' बंधनकारक

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

India Economy: भारत होणार श्रीमंत अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्न पोचणार 4000 डॉलरपर्यंत; वाचा एसबीआय रिसर्चचा Report

SCROLL FOR NEXT